‘हर घर संविधान, घर घर संविधान उपक्रमांतर्गत संविधानाचे मोफत वाटप; सामाजिक कार्यकर्ते अंकुश पाटील शिखरे यांचा पुढाकार नांदेड – लोहा तालुक्यातील जवळा येथील रहिवाशी सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे यांनी जवळा येथील विश्वशांती बुद्ध विहारावर आयोजित माता रमाई यांच्या 128 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये भारतीय संविधानाच्या शेकडो प्रतिनचे मोफत वाटप केले असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामीण भागातून कौतुक करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर आदर्श अशा भारतीय संविधानावर आपल्या भारत देशाची व्यवस्था उत्तम प्रकारे चालू असून या संविधानाने संपूर्ण भारत देश एकसंध ठेवला आहे. अशा भारतीय संविधानाची ओळख सर्वसामान्य जनतेला व्हावी आणि घराघरात संविधान हा ग्रंथ वाचला जावा म्हणून ‘ हरघर संविधान, घरघर संविधान हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे यांनी नांदेड जिल्ह्यात सुरु केला असून प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते महिला – पुरुष, युवकांना भारतीय संविधानाचे वाटप करुन हे संविधान घेवून घरी ठेवू नका तर प्रत्येकाने वाचा असा अग्रह करत आहेत. रमाई यांच्या 128 व्या जयंती निमित्त जवळा या गावामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरिकांना भारतीय संविधानाच्या शेकडो प्रतीचे मोफत वाटप केले. यावेळी नांदेड आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी राहुल आत्राम, तर प्रमुख पाहुणे म्हणून सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुभाष खाडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संरक्षण सचिव आनंद गोडबोले, प्रसिद्ध स्तंभलेख भैय्यासाहेब गोडबोले, प्रसिद्ध साहित्यिका रुपाली वागरे, ख्यातनाम पत्रकार राजेश्वर कांबळे, माजी सरपंच साहेब शिखरे, जवळा दे चे पोलीस पाटील नितीन गवळी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद मोरे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे, माता रमाई जयती मंडळाच्या अध्यक्षा भारतबाई निखाते, उपाध्यक्षा करुणाबाई गच्चे, भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष भीमराव गोडबोले, सचिव मायाबाई गोडबोले, समता सैनिक दलाच्या केंद्रीय सहाय्यक शिक्षिका तेजस्विनी मस्के, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अंकुश शिखरे यांच्या ‘हरघर संविधान, घरघर संविधान उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. Kanthak Suryatal Post Views: 504 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे परीक्षा केंद्रांवर कडक नजर– जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ