कंधारमध्ये घरातील सोन्याचे दागिणे चोरले; मुदखेड तालुक्यात सोन्या-चांदीच्या दागिण्यांची चोरी

नांदेड(प्रतिनिधि)-कंधारमध्ये कुलूप न लावलेल्या घरातून चोरट्यांनी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे लंपास केले आहेत. हा प्रकार सिध्दार्थनगर भागात घडला.मुदखेड तालुक्यातील रोहिपिंपळगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 64 हजार 470 रुपयांचा ऐवज चोरला आहे.
मिना रवि शंखपाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 6 ते 3 फेबु्रवारीच्या दुपारी 3 वाजेदरम्यान त्यांनी आपल्या घराला कुलूप न लावता कार्यक्रमाला गेल्यानंतर कोणी तरी चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. कंधार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 39/2026 दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार चोपवाड अधिक तपास करीत आहेत.
कल्पना श्रावण शिंदे यंानी दिलेल्या तक्रारीनुसार 5 फेबु्रवारीच्या मध्यरात्रीनंतर 1 ते पहाटे 5 वाजेदरम्यान दरवाज्याचे कुलूप तोडून कोणी तरी आत प्रवेश केला आणि कपाटात साड्यांच्या खाली ठेवलेल्या चाबीने गुप्त कप्पा उघडून त्यात ठेवलेले 64 हजार 470 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहे. मुदखेड पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 21/2026 दाखल केला असून पोलीस अंमलदार चकरधर अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!