नांदेड -आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियान २.० चा शुभारंभ आज आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पंचायत समिती किनवट येथे करण्यात आला आहे.
केंद्र सरकार नीती आयोगाच्या महत्वाकांक्षी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत किनवट तालुका समाविष्ट असून यात एकूण ४० निर्देशकांचा समावेश करण्यात आलेला आहे. मागील वर्षी जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत संपूर्णता अभियान राबविण्यात आला. यातील मिळालेल्या यशानंतर केंद्र सरकारच्या नीती आयोगाने सध्या २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत संपूर्णता अभियान २.० अभियानाची सुरुवात केली असून यात आरोग्य-पोषण, शिक्षण आणि कृषी-पशुसंवर्धन या क्षेत्रांतर्गत ६ निर्देशक समाविष्ट करण्यात करण्यात आले आहेत जे कि १४ एप्रिल २०२६ पर्यंत १०० टक्के पूर्ण करावयाचे आहेत.
याचाच एक भाग म्हणून आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते आज किनवट येथील पंचायत समिती सभागृहात सदर अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी संजय राठोड माजी सभापती (समाजकल्याण), दत्ता भाऊ आडे माजी सभापती पंचायत समिती, आमदार महोदयांचे स्वीय सहाय्यक संतोष मरसकोल्हे, प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा), जयश्री वाघमारे गटविकास अधिकारी, संतोष बघेले उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, डॉ.के पि गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी, अनिल महामुने गटशिक्षणाधिकारी, शिवाजी जामोदे बालविकास प्रकल्प अधिकारी, उमेश धोंड पशुधन विकास अधिकारी (विस्तार), विस्तार अधिकारी वसंत वाघमारे, निवृत्ती मूकनर वरिष्ठ सहाय्यक राजेश म्याकलवार हे उपस्थित होते.
यावेळी आमदार श्री. केराम यांनी सदर अभियानात समाविष्ट निर्देशांक १०० टक्के संप्रूक्त करण्यासाठी अधिक गतीने काम करावे, यासाठी विविध विभागाशी समन्वय ठेवून निर्धारित उद्दिष्ट साध्य करावे, अधिक प्रभाविपणे काम करून तालुक्याचे नाव दैदिप्यमान करणाऱ्या विभागांचा व संबंधित अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येईल यासाठी सर्वांनी सदर महत्वाकांक्षी कार्यक्रमात सर्वांनी पुढे येऊन योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांनी ही संबंधित निर्देशांक कसे पूर्ण करता येईल यासाठी सखोल मार्गदर्शन केले आणि आरोग्य विभाग व महिला बालविकास व ग्रामपंचायत विभाग यांच्या समन्वयाने हे सहज शक्य आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांनी केले. सदर प्रस्ताविकेतुन त्यांनी यंत्रणानिहाय समावेशित निर्देशकांची माहिती दिली व एकंदरीत उपस्थितांना सदर कार्यक्रमाचा परिचय करून दिला आहे.
सदर अभियांनात समावेशित निर्देशक –
1. ICDS च्या SNP कार्यक्रमांतर्गत ०६ महिने ते ०६ वर्षापर्यंतच्या लाभार्थी बालकांना पूरक पोषण आहार वितरण करणे
2. प्रत्येक अहवाल महिन्यातील नोंदीत सर्व बालकांची कार्यक्षमता मोजणे
3. प्रत्येक अंगणवाडीस शौचालय सुविधा उपलब्ध करणे
4. प्रत्येक अंगणवाडीस पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे
5. प्रत्येक शाळेत मुलींसाठी शौचालय सुविधा उपलब्ध करणे
6. सर्व गोवंशिय जनावरांचे लाळ व खुरकत रोगाविरुद्ध लसीकरण करणे

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षित कार्यक्रमाचे समन्वयक पांडुरंग मामीडवार यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी निवृत्ती मूकनर यांनी मानले.
सदर शुभारंभ कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, सहा.प्रशासन अधिकारी श्री टोम्पे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अल्केश शिरसेटवार, सर्व विस्तार अधिकारी, RGSA तालुका व्यवस्थापक अभिजित गरड, कनिष्ठ सहाय्यक अंकुश राठोड, सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, पशुधन विकास अधिकारी, सर्व पशुवैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, सर्व कार्यालयीन कर्मचारी यांची उपस्थिती होती.
तालुका कक्ष वॉर रूमची केली पाहणी
आमदार महोदयांनी यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियांन अंतर्गत पंचायत समिती स्तरावर प्रचार प्रसिद्धी व योजणांच्या सार्वत्रिकिकरणासाठी तयार करण्यात आलेल्या वॉर रूमची ही यावेळी पाहणी करून शुभेच्छा दिल्या.
पोषण आहार जनजागृती स्टॉलचे उदघाटन
यावेळी आमदार श्री. केराम यांनी ICDS विभागाने संपूर्णता अभियानाच्या शुभारंभाचे औचित्य साधून तयार केलेल्या पोषण आहार जनजागृती संदर्भात तयार केलेल्या स्टॉल ला भेट देऊन पाहणी केली व विभागाचे कौतुक केले.

