माता रमाई भिमराव आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-आज आंबेडकर समुदायाने माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
माता रमाई जयंती निमित्ताने काल रात्रीपासूनच शहरभर अनेक ठिकाणी आतिषबाजी करण्यात आली, रोषणाई करण्यात आली.
आज पहाट होताच सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. अनेक जागी माता रमाई जयंतीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली. दुपारनंतर अनेक जयंतीमंडळांनी माता रमाई यांच्या मिरवणूका काढल्या. युवक-युवती अबाल वृध्द असे सर्वच वयोगटातील नागरीक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. वाजत गाजत या मिरवणुका वृत्तलिहिपर्यंत सुरूच होत्या. या मिरवणुकांचा समारोप विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!