नांदेड(प्रतिनिधी)-आज आंबेडकर समुदायाने माता रमाई भिमराव आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. माता रमाई जयंती निमित्ताने काल रात्रीपासूनच शहरभर अनेक ठिकाणी आतिषबाजी करण्यात आली, रोषणाई करण्यात आली. आज पहाट होताच सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. अनेक जागी माता रमाई जयंतीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आली. दुपारनंतर अनेक जयंतीमंडळांनी माता रमाई यांच्या मिरवणूका काढल्या. युवक-युवती अबाल वृध्द असे सर्वच वयोगटातील नागरीक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते. वाजत गाजत या मिरवणुका वृत्तलिहिपर्यंत सुरूच होत्या. या मिरवणुकांचा समारोप विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 746 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation फौजदार मिलिंद सोनकांबळे यांनी एटीएम फोडणारा चोरटा रंगेहात पकडला पंचशिल बुद्ध विहार विश्वनाथ नगर नांदेड येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी