नांदेड – मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्री गुरुगोबिंदसिघजी औद्योगिक संस्था, नांदेड यांच्यावतीने सोमवार 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा. आयटीआय पास उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएमएनएएम भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आयटीपास उमेदवारांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एस.व्ही. सुर्यवंशी व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के.अन्नपुर्णे यांनी केले आहे. या मेळाव्यासाठी पुढील व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. मेकॅनिकल मोटर व्हेईकल, फिटर, टूल अँड डाय मेकर, पेंटर जनरल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल ट्रॅक्टर, वेल्डर, वेल्डर (जीएमएडब्ल्यू आणि जीटीएडब्ल्यू), शीट मेटल वर्कर आयसीटी एस एम, टर्नर , मशिनिस्ट ग्राइंडर ,वायरमन, मशिनिस्ट, फाउंड्रीमॅन इ. व्यवसायाचे उमेदवार भरती करण्यात येणार आहेत.
More Related Articles
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पथकाची अवैद्य वाळूवर कार्यवाही;एक कोटी सात लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा विशेष पथकाने १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे विमानतळ…
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा 93 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाची स्थापना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नातून 15 ऑक्टोबर…
अर्थसंकल्पाची महेफिल नरेंद्र मोदी यांनी लुटली
काल जाहीर झालेल्या 2025 या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पामध्ये 12 लाख रुपये वार्षिक कमाई करणाऱ्या लोकांना शुन्य…
