नांदेड(प्रतिनिधी)-चोरी झालेला ट्रॅक्टर, बांधकामाच्या सेंट्रींग प्लेट आणि टॅंकर असा 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल दोन चोरट्यांना पकडून कंधार पोलीसांनी जप्त केला आहे.
शरद मुरलीधर हनमंते रा.धरणी ता.चाकूर जि.लातूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 जानेवारी 2026 च्या दुपारी मौजे आनंद वाडी घोडज ते बोरी जाणाऱ्या रस्त्यावरून त्यांच्या मालकीची ट्रॅक्टर ट्रॉली, सेंट्रींग प्लेट आणि टॅंकर असा 2 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 25/2026 दाखल करण्यात आला.
कंधारच्या पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात कंधारचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव, पोलीस अंमलदार धोंडीबा चोपवाड, सुनिल साखरे, पंडीत आचने, रमेश जागपेटे आणि सतिश बलुरे यांनी आ पल्या गोपनिय माहितगारांकडून काढलेल्या माहितीनुसार चोरीचे साहित्य हळदव ता.लोहा शिवारात आहे. पोलीसांनी तेथे जाऊन गोविंद व्यंकटी चौंडे (23) आणि ओमकार बालकिशन चौंडे यांच्या ताब्यातून ट्रॅक्टरची ट्रॉली 1 लाख रुपये किंमतीची, सेंट्रींग प्लेट 40 हजार रुपये किंमतीच्या आणि ट्रॅक्टर 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे असा 2 लाख 80 हजार रुपयांचा चोरीला गेलेला ऐवज 100 टक्के जप्त केला आहे आणि दोघांना अटक केली आहे.
72 तासात कंधार पोलीसांनी चोरीचा 100 टक्के ऐवज जप्त केला
