तीन लाख पानांत मोदींचं नाव, पण उत्तर मात्र शून्य! अमेरिकेच्या विमानात भारताचं धोरण ठरतंय?
अकरा वाजता अर्जसंकल्पनेवरील भाषण सुरू झाले आणि भाषण संपेपर्यंत सभागृह जणू उद्यापर्यंत ‘सीलबंद’ झाले. दरम्यान, काल मध्यरात्री विदेश मंत्रालयाने एक खळबळजनक खुलासा जाहीर केला. जेफ्री एफस्टीन फाईल्समधील तीन स्वतंत्र फोल्डर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असल्याचे समोर आले. आता काँग्रेस विचारते नाव का आले? कुठली मदत घेतली? फाईलमध्ये तर “डान्स केला, गाणे गायले” असे उल्लेखही आहेत म्हणे! आणि या सगळ्याचा फायदा थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना झाला, असा दावा.
फाईल्स कुणी चिठ्ठीवर लिहिलेल्या नाहीत तीन लाख पाने, दीड लाख फोटो आणि दोन हजार व्हिडिओ असलेली ही सामग्री थेट अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केली आहे. अशा प्रचंड आणि अधिकृत फाईलमध्ये भारताच्या पंतप्रधानांचे नाव येणे ही काही किरकोळ बाब नाही, हे मान्य करायलाच हवे.

पण इथेच खरी गंमत सुरू होते.एकीकडे अर्थसंकल्पीय भाषण सुरू असताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विमानात बसून प्रेस कॉन्फरन्स घेतात हो, उडत्या विमानात! आणि तिथेच सांगतात की भारत आता व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे. कारण काय? तर त्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या पत्नीला अमेरिकेने घरातून उचलून तुरुंगात टाकले आहे, त्यांच्यावर ड्रग तस्करीचे आरोप आहेत! आणि आता सर्व तेल साठे आमच्या हातात आहेत असे ट्रम्प ने अगोदरच सांगतले आहे.भारत सरकारकडून मात्र याबाबत एक शब्दही नाही. मग प्रश्न असा पडतो भारताच्या धोरणांची माहिती भारत सरकार देणार की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
यावर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणतात की, “ऑपरेशन सिंदूर थांबवल्यापासून ते रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यापर्यंतची सर्व माहिती आम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून मिळते.” म्हणजे आता भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रवक्ता व्हाईट हाऊस आहे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, ३० जानेवारी रोजी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा झाली. पण तेल खरेदीबाबत मात्र एकही शब्द नाही. आणि दुसरीकडे ट्रम्प आत्मविश्वासाने घोषणा करतात भारत तेल खरेदी करणारच! विरोधकांना संधी मिळू नये तरच नवल.
रॉयटर्ससारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाही बातमी छापतात की भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली आहे. पत्रकार रवीश कुमार विचारतात भारताची माहिती भारताकडून मिळत नाही, पण ट्रम्प रोज नवीन अपडेट देतात.आणि कळस म्हणजे रिलायन्स कंपनीनेच प्रसिद्धीपत्रक काढून सांगितले की आम्ही तेल खरेदी करणार नाही, तेव्हा ट्रम्प म्हणाले, “नरेंद्र मोदी मला खुश करत आहेत.”

मग प्रश्न उरतोच भारताबद्दलची प्रत्येक गोपनीय माहिती डोनाल्ड ट्रम्पकडे का आहे? पंतप्रधान निवडणूक सभांमध्ये तासन्तास बोलतात, विरोधकांसाठी शब्दकोशात लाखो शब्द आहेत, पण ट्रम्प खोटे बोलत आहेत हे सांगण्यासाठी एकही शब्द शिल्लक नाही का? परराष्ट्र मंत्रालय तरी उत्तर देणार आहे का? की भारताच्या परराष्ट्र धोरणाची घोषणा पुढेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच करणार आहेत?
