१ पोलीस उपअधीक्षक,४ पोलीस उपनिरीक्षक, २ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, ५ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि ३ पोलीसअंमलदार
नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलातून आज एक पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, दोन श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पाच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस अंमलदार असे एकूण 15 अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती (सेवानिवृत्ती) झाली. यानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड येथे आज सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला.
आज नांदेड जिल्ह्यातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे आहेत
पोलीस उपअधीक्षक डेनियल जॉन बेन (नांदेड ग्रामीण)
पोलीस उपनिरीक्षक
सुरजितसिंघ किशनसिंग माळी (पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण),
मंचक होनाजीराव फड (देगलूर),
पोलीस उपनिरीक्षक
शंकर रावसाहेब देशमुख (जिल्हा विशेष शाखा, नांदेड),
सूर्यकांत किशनराव काठोडे (पोलीस नियंत्रण कक्ष),
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक
रामजी शामा जाधव (पोलीस मुख्यालय),
संभाजी इरबा देवकांबळे (भोकर),
सहायक पोलीस उप निरीक्षक
वामन सखाराम कोकाटे (पोलीस मुख्यालय),
सुखदेव रावजी वरघट (पोलीस मुख्यालय),
श्यामसिंग रवीसिंग ठाकूर (पोलीस मुख्यालय),
अमीर मोहम्मद दौलतखान पठाण (पोलीस ठाणे कंधार),
रंगाबाई किशन मेंडके (मांडवी),
पोलीस अंमलदार
किशोरकुमार पांडुरंग मुंडे (भाग्यनगर),
मोहन मारुतीराव बोडके (पोलीस ठाणे तामसा),
गोविंद सिताराम पवार (पोलीस ठाणे देगलूर).

या सन्मान समारंभास पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सूरज गुरव,उपविभागीय पोलीस अधिकारी (मुख्यालय) डॉ. अश्विनी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमास पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, जनसंपर्क अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बासंबेकर ,विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी ,मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच सेवानिवृत्तांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचक शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख रियाज यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनसंपर्क विभागातील मारुती कांबळे, नरेंद्र राठोड तसेच पोलीस कल्याण विभागातील सविता अभिमान वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले.
