नांदेड (प्रतिनिधी) येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. पाठक हे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने आज नांदेड जिल्हा सरकारी वकील कार्यालयात त्यांना औपचारिक निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.नांदेड येथे या पदावर न्या. एन. के. ब्रम्हे यांची नियुक्ती झाली आहे.
या निरोप समारंभास जिल्हा सरकारी अभियोक्ता अॅड. रणजीत देशमुख, सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. यादव तळेगावकर, अॅड. एम. ए. बत्तुला (डांगे), अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. मोहम्मद अब्बास, अॅड. बुलबुले तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी,कर्मचारी आणि सर्व पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार उपस्थित होते. उपस्थितांनी मा. पाठक यांच्या न्यायिक कारकिर्दीचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


दरम्यान, नांदेड जिल्ह्यात रिक्त झालेल्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पदावर सांगली जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2 फेब्रुवारी 2026 रोजी नांदेड येथे कार्यभार स्वीकारणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
