नांदेड- विमान अपघातात निधन झाल्याचे कळताच जवळा देशमुख येथील चिमुकल्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., विषय शिक्षक उमाकांत बेंबडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश गोडबोले, आनंद गोडबोले, गुणवंत गच्चे, भीमराव गोडबोले, फारुख पठाण, राजेश शिखरे, मनिषा गच्चे यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर राज्य सरकारने सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी व तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचा आदेश जारी केला. जवळा देशमुख येथील प्राथमिक शाळेत शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शाळेस सुट्टी जाहीर करण्यात आली. अजित पवार यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

