हिंद दी चादर कार्यक्रमानिमित्त वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्था नांदेड अंतर्गत निशुल्क शुगर तपासणी

नांदेड –  हिंद दी चादर श्री गुरुतेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड येथील मोदी मैदानावर वैष्णवी आरोग्यदायी सेवाभावी संस्थाच्या वतीने शुगर निशुल्क तपासणी शिबीर स्टॉल नं. ३८८ वर भक्तांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. हे शिबीर दिनांक २४ व २५ जानेवारी रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी १० पर्यंत निरंतर सेवा चालू होती.  या शिबीरात २२१ भक्तांनी निशुल्क शिबीराचा लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मांगीलाल रामा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कृष्णा तुकाराम पवार, नागनाथ माधवराव कुरुंदे, शालिनी शंकर राऊत, अश्विनी बालाजी इंगोले, शेख रेशमा शेख मगदुम, आरती साहेबराव लोंढे या अहोरात्र परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!