नांदेड –नांदेडच्या भीमघाट परिसरातील जेष्ठ नागरिक आमचे स्नेही पत्रकार विकास गजभारे यांच्या मातोश्री स्मृतीशेष गोदावरीबाई बळीरामजी गजभारे (वय-८० वर्षे) यांचे १८ जानेवारी रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर सोमवार दि. १९ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता नांदेडच्या गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नांदेड येथील सेवानिवृत्त एम्प्लॉयमेंट अधिकारी दिवंगत बी. एम. गजभारे यांच्या ‘त्या’ पत्नी, तर सेवानिवृत्त अप्पर कोषागार अधिकारी बी. बी. गजभारे, प्रा. डॉ. सुरेश गजभारे, प्रकाश गजभारे, पत्रकार विकास गजभारे तसेच विशाल गजभारे यांच्या त्या मातोश्री होत.
More Related Articles
साश्रुनयनांनी शहीद सचिन वनंजे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
नांदेड:- भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान सचिन यादवराव वनंजे यांचा देशसेवेच्या कर्तव्यावर असताना श्रीनगरच्या…
20 लाखांचे 150 मोबाईल नांदेड सायबर पोलीसांनी शोधले
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर शाखेने मिसिंग प्रकारातील 150 ऍन्ड्राईड फोन हस्तगत केले आहेत आणि…
नांदेडमध्ये बिहारसारखी गुन्हेगारी? भरदिवसा रस्त्यावर मारहाण, जबरदस्तीने घेतली रजिस्ट्री
नांदेड,(प्रतिनिधी)- काल, दिनांक 25 जुलै 2025 रोजी दुपारी नांदेडमधील आयटीआय समोरच्या रस्त्यावरील मधुर भोज समोर…
