नांदेड : येथील डॉ. आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी शीलाबाई मुरली शेळके (वय 43) यांचे गुरुवार, दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शीलाबाई शेळके या मनमिळावू व कुटुंबवत्सल स्वभावामुळे परिसरात परिचित होत्या. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर तसेच नातेवाईकांवर मोठा आघात झाला आहे. त्यांची अंतिमयात्रा आज दुपारी 3 वाजता त्यांच्या राहत्या घरातून, डॉ. आंबेडकर नगर येथून निघणार असून त्यानंतर गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, जावई, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शीलाबाई शेळके यांच्या निधनाबद्दल विविध स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. Kanthak Suryatal Post Views: 739 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation इराण युद्धात आम्ही आपले उद्देश जवळ जवळ पूर्ण केले आहेत – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असतानाच इराणने तेल अवीव मध्ये क्षेपणास्त्रे डागून हाहाकार माजवला ; यूएइ आणि बहरीन वर सुद्धा केले हल्ले