नांदेडकरांनी उधळले गुलालासोबत निळा आणि हिरवा रंग

एमआयएमची मुसंडी, वंचितने प्रथमच उघडले खात
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचा 7/12 अशोक शंकरराव चव्हाण यांच्याच नावे असल्याचे पुन्हा एकदा नांदेडकरांनी सिध्द करून दाखवले. खा.अशोक चव्हाण जिथे जातील तिथे नांदेडकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असल्याचा दाखलाच 16 जानेवारीच्या महापालिका निकालाने स्पष्ट करून दाखवला. राज्यात एमआयएमचा प्रवेश नांदेडमधून झाला होता. त्यावेळी महापालिका निवडणुकीत एमआयएम 11 जागांवर विजयी झाली होती. यात आता 2 जागांची भर पडत 13 जागांवर विजय मिळवला तर प्रथमच महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने आपले खाते उघडले आहे. राज्यात नांदेड महापालिका निकाल मात्र वेगळाच लागला यात नांदेडकरांनी सर्व धर्म समभाव असल्याचे दर्शन या निकालातून दाखवले.

Oplus_16908288

प्रदिर्घ प्रतिक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या. पहिल्या टप्यात नगरपालिका निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपाला म्हणाव तस यश मिळाल नसल तरी महापालिका निवडणुकीत मात्र भारतीय जनता पार्टीने आपला दबदबा कायम राखला. नांदेड महापालिकेच्या 20 प्रभागातील 81 जागांसाठी 491 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दि.15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि 16 जानेवारीला याचा निकाल घोषित झाला. सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रत्यक्ष सुरूवात झाली असतांना यामध्ये सुरूवातीला पोस्टल मतदान मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीनची मोजणी करण्यात आली. पण यामध्ये एकीकडे राज्यातील महापालिकेचा निकाल पटापट येत असतांना नांदेड महापालिकेच्या निकालासाठी मात्र विलंब झाला. दुपारी 1 वाजेच्यानंतर निकाल येण्यास सुरूवात झाली. सुरूवातीला भारतीय जनता पार्टीने आपले खाते उघडत दणदणीत विजय मिळवला. एकापाठोपाठ एक भारतीय जनता पार्टीच्या विजयी उमेदवारांची घोषणा ऐकावयास मिळत असतांना एमआयएम या पक्षानेही खाते उघडण्यास सुरूवात केली. त्यापाठोपाठ कॉंगे्रस पक्षानेही आपली विजयी घौडदौड सुरू करत 12 जागांवर विजय मिळवला. महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच वंचित बहुजन आघाडीने दणदणीत विजय मिळवत 5 जागा ताब्यात घेतल्या. सत्तेत असणार्‍या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंगे्रस अजित पवार गटाला सपाटून मार खावा लागला. यामध्ये राष्ट्रवादी कॉंगे्रसला एक जागा तर शिवसेना शिंदे गटाला 4 जागा असा एकूण 5 जागांवर समाधान मानावे लागले.
प्रभाग क्रमांक 3 मध्ये उमेदवारीवरून नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच मर्जीतील माणसाला उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी थेट आ.बालाजी कल्याणकर यांच्याकडे केली होती. मात्र आ.कल्याणकर यांनी सौभाग्यवतीचा आधार घेत अपक्ष उभे राहिलेल्या मिनल पाटील यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केला. पण जनतेने मात्र त्यांना भरभरून आशिर्वाद देवून सत्याचा विजय घडवून आणल्याचे प्रभाग क्रमांक 3 मध्ये ऐकावयास मिळाला.

सायंकाळी उशीरापर्यंत मतमोजणी सुरू राहिली. काही जगांवर फेरमतमोजणी झाली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 1, 2 यामध्ये फेरमतमोजणी झाली. यात आ.बालाजी कल्याणकर यांच्या मुलाने विजय मिळवला तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये कॉंगे्रस आणि वंचित आघाडीने विजय मिळवला. तर खा.अशोक चव्हाण यांच्या प्रभागातच भारतीय जनता पार्टीला हार मानावी लागली. याठिकाणी कॉंगे्रस पक्षाचे दोन शिलेदार निवडूण आले आहेत.

विजयी उमेदवारांची यादी…

NWMC Nanded Result 2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!