नांदेड(प्रतिनिधी) -पुणे ते देगलूर या ट्रव्हल्स गाडीने प्रवास करतांना ट्रव्हल्स गाडीच्या डिकीमध्ये ठेवलेली बॅग चोरीला गेली. त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिणे व इतर मौल्यवान साहित्य होते. त्याची किंमत 1 लाख 87 हजार रुपये आहे.
नरंगल ता.देगलूर येथील विक्रम अशोक कांबळे हे 12 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता पुणे येथून ट्रव्हल्स गाडी क्रमांक एम.एच.14 एल.बी.7353 मध्ये बसले या गाडीचे नाव ग्लोबल ट्रव्हल्स असे आहे. 13 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता देगलूरला पोहचले. त्या दरम्यान ट्रव्हल्स गाडीच्या डिक्कीत ठेवलेली त्यांची बॅग चोरीला गेलेली होती. या बॅगमध्ये सोन्या-चांदीचे दागिणे व इतर किंमती साहित्य असा एकूण 1 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज होती. देगलूर पोलीसांनी या संदर्भाने गुन्हा क्रमांक 20/2026 दाखल केला असून पोलीस अंमलदार घुमे अधिक तपास करीत आहेत.
ट्रव्हल्स गाडीतून 1 लाख 87 हजारांच्या ऐवजाची बॅग चोरली
