चित्ररथाचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम; पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

हिंगोली – नांदेड येथे येत्या 24 व 25 जानेवारी 2026 रोजी आयोजित हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नऊ समाजासह इतरही भाविकांमध्ये व्यापक प्रमाणावर जनजागृती व्हावी, यासाठी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोहरादेवी गडाचे महंत सुनीलजी यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.

यावेळी नांदेड क्षेत्रिय समितीचे अशासकीय सदस्य अॅड. संतोष राठोड, हरनामसिंह चव्हाण, सतवतसिंह चव्हाण, राज्य समन्वयक तेजासिंह बावरी, रथ जिल्हा समन्वयक अंबादास दळवी, संतोष जाधव, मलकितसिंह भाटीया, दिलीप राठोड, डॉ. आकाश राठोड यांच्यासह समजाबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.या चित्ररथासोबत पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज जिल्ह्यातील तांड्यांवर जावून समाज जनजागृती करणार आहेत. या चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, हा मुख्य उद्देश आहे. हे दोन्ही रथ जिल्ह्यातील वस्ती, तांड्यांवर जावून ‘हिंद दी चादर’ या विशेष कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्‌ह्यात एक चित्ररथ आणि एक एलईडी रथाच्या माध्यमातून सिख – सिकलिगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी समाज या सर्व नऊ समाजामधील भाविकांमध्ये नांदेड येथे होणाऱ्या हिंद दी चादर या श्री. गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाजबांधवांकडे विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!