नायगाव (प्रतिनिधी) -तालुक्यातील मौजे गडगा येथे अज्ञात चोरट्यांनी पशुधन चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात दहा शेळ्या, एक बोकड आणि दोन शेळीची पिल्ले असा एकूण १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.
याप्रकरणी सय्यद अजीम सय्यद मुसा यांनी नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेपासून १० जानेवारी रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास मौजे गडगा तालुका नायगाव येथील त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या तीन शेडच्या पत्र्यामध्ये बांधून ठेवलेले पशुधन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
या चोरीत दहा शेळ्या, एक बोकड व दोन शेळीची पिल्ले असा एकूण १,३९,००० रुपयांचा पशुधनाचा तोटा झाला आहे. याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७/२०२६ दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोमनाळकर पुढील तपास करीत आहेत.
