नांदेड – केंद्र शासनाचा ट्रान्सजेंडर व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, 2019 व त्याअंतर्गत नियम 2020 संपूर्ण देशात लागू करण्यात आले आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसाठी केंद्र शासनामार्फत स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथीयांसाठी नॅशनल हेल्पलाईन क्रमांक 14427 उपलब्ध करून देण्यात आला आहे. या हेल्पलाईनद्वारे तृतीयपंथीय व्यक्तींना त्यांच्या हक्कांबाबत माहिती, मार्गदर्शन व सहाय्य मिळणार आहे.
नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी या नॅशनल हेल्पलाईन क्रमांकाचा व्यापक प्रचार व प्रसिध्दी करण्यात येत आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
