नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने जबरी चोरी करणारे दोन जण पकडले असून त्यांच्याकडून 4 लाख 39 हजार 22 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी दिलेल्या अहवालाप्रमाणे त्यांनी आपल्या खात्रीशीर माहितीवरुन सय्यद हनीफ सय्यद जाफर (23), संजय पंडीत नामनुर(34) दोषे रा.नुरी चौक नांदेड यांना ताब्यात घेवून विचारणा केली असता त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेला गुन्हा क्रमांक 397/2025, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेला गुन्हा क्रमांक 622/2025 आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेला गुन्हा क्रमांक 395/2025 केल्याची कबुली दिली. या चोरट्यांकडून सोन्याचे 32.110 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे किंमत 3 लाख 18 हजार 811 रुपये 199.08 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिणे किंमत 50 हजार 211 रुपये आणि गुन्हा करतांना वापरलेली 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण 4 लाख 39 हजार 22 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत पोलीस ठाण्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी कामगिरी करणारे पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार बामणे, अजरोद्दीन, रितेश कुलथे, बिरादार, राठोड, घेवारे, दिपक ओढणे यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरटे पकडून 4 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त केला
