दबंग पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांची जबरदस्त कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-दबंग पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने चार महिला चोरट्यांना पकडून 6 पोलीस ठाण्यातील 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्या महिलांकडून 11.07 तोळे सोन्याचे दागिणे आणि 16 तोळे चांदीचे दागिणे असा एकूण 5 लाख 68 हजार 290 रुपयांचा ऐवज जप्त केला.
नुतन सहाय्यक पोलीस अधिक्षक शशांक यांच्या नेतृत्वात अत्यंत कर्तव्यदक्ष आणि शिस्तीचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे, पोलीस अंमलदार शितल सोळंके, सुनिल गटलेवार, माधव माने, संघरत्न गायकवाड, शेख उमर, महेश बडगु, श्रीराम दासरे आणि सुधाकर देवकत्ते यांनी इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर भागातून तीन महिला आणि एक तृतीयपंथी असे चार जणांना पकडले. त्यांची नावे पुनम आतिश हातवळणे (29), राखी हिरा हातवळणे (40), शन्नू राजू हातवळणे(50) आणि महेश दिनाजी गायकवाड अशी आहेत.
या चोर महिला आणि एका तृतीयपंथीयाकडून मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3, बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 तसेच अर्धापूर, कंधार, लोहा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील प्रत्येकी एक असे 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या तीन महिला आणि एका तृतीयपंथ्याकडून 11.07 तोळे वजनाचे दागिणे, 16 तोळे वजनाचे चांदीचे दागिणे असा 5 लाख 68 हजार 290 रुपयांचा चोरीतील ऐवज जप्त केला आहे. या चोर महिला आणि तृतियथ्यांनी बस प्रवासादरम्यान महिला प्रवाशी बसमधून खाली उतरत असतांना आणि बसमध्ये जात असतांना गर्दीचा फायदा घेवून या चोऱ्या केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!