नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 आणि 25 रोजी श्री गुरु तेगबहादुरजी यांचा 350 वा शहिदी समागम समारंभ हिंद दी चादर नांदेडमध्ये साजरा होणार आहे. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात नांदेड, महाराष्ट्र, देश आणि विदेशातील सर्व जाती-धर्माच्या नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सचखंड श्री हजुर साहिब येथील मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभाग व राज्य स्तरीय समागम समितीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत संत बाबा कुलवंतसिंघजी बोलत होते. या पत्रकार परिषदेत दमदमी टकसालचे जत्थेदार संत बाबा हरनामसिंघजी, मितगं्रथी भाई ज्योतिंदरसिंघजी, हेडग्रंथी भाई कश्मिरसिंघजी,मितग्रंथी भाई रामसिंघजी,धुपिया भाई गुरमितसिंघजी, लंगरस साहिब गुरुद्वाराचे संत बाबा बलविंदरसिंघजी, गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष विजय सतबिरसिंघ, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्यासह अनेक संत उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलतांना जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी म्हणाले की, नांदेडमध्ये होणारा हा समागम कार्यक्रम पाहयासाठी त्यातील उद्देश समजून घेण्यासाठी, त्यातून शिकवण घेण्यासाठी फक्त सिख समाजच नव्हे तर प्रत्येक समाजातील लोकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे. नांदेडसह महाराष्ट्र, देश, विदेश येथील प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला मी आवाहन करतो की, आपण या कार्यक्रमात नक्कीच या. सोबतच मी नांदेडच्या प्रत्येक नागरीकाला सुध्दा आवाहन करतो की, आमच्याकडे येणाऱ्या अभ्यागतांंच्या स्वागतासाठी तुम्ही तयार राहा . कारण नांदेडमधून गेल्यावर त्यांना नांदेडची आठवण विसरता येणार नाही असे सहकार्य त्यांना द्या.
याप्रसंगी भाई रामेश्र्वरजी यांनी 350 वर्षापुर्वीचीचे श्री गुर तेगबहाद्दुरजी यांचे बलिदान आणि त्यांच्या जीवनाचा संपुर्ण ईतिहास जगातील प्रत्येक व्यक्तीकडे पोहचविण्यासाठी हिंद -दी -चादर हा कार्यक्रम महत्वपुर्ण आहे.
याप्रसंगी दमदमी टकसालचे संत बाबा हरनामसिंघजी यांनी या कार्यक्रमाची रुपरेषा थोडक्यात सांगितली. या कार्यक्रमाचा पहिला भाग नागपूर येथे डिसेंबर महिन्यात पार पडला. नांदेडमधील कार्यक्रम या महिन्यात होत आहे आणि मुंबईमध्ये हा कार्यक्रम फेबु्रवारीमध्ये होणार आहे. तसेच अमृतसर, हरीयाणा, मुंबई, हैद्राबाद अशा विविध भागातून सहा रेल्वे गाड्या भाविकांना आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिल्या आहेत. अर्थात भाविकांना कोणत्याही खर्च लागणार नाही.
या प्रसंगी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सांगितले की, या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोण-कोणत्या पध्दतीने काम करावे लागते या सर्वांचा नियोजित आराखडा तयार केला आहे. वेगवेगळे काम करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स् थापन केल्या आहेत आणि त्याद्वारे या कामाला अत्यंत नियोजितपणे होईल यासाठी मी प्रयत्न करत आहे.
जगातील प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीने हिंद-दी-चादर कार्यक्रमात सहभागी व्हावे-संत बाबा कुलवंतसिंघजी
