व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरोला अमेरिकेने थेट उचलून आपल्या देशात नेले आणि जणू एखाद्या वेड्याला कोंडावं तसं डांबून चौकशी सुरू केली. हा प्रकार नेमका काय म्हणायचा? एका सार्वभौम देशावर आक्रमण करून त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखालाच उचलून नेणे हे अपहरण नाही तर काय? आज या घटनेवर जगभरातून अमेरिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यात उत्तर कोरियाचे प्रमुख तर थेट म्हणतात, “तो माझा मित्र आहे, त्याला सोडा; नाहीतर तिसरे महायुद्ध पेटेल.”
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदावर बसलेला हा माणूस यांचा व्यवहार कायमच अतिरेकी राहिलेला आहे. निवडणूक हरल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी संसद भवनावर कब्जा केला, अनेक सरकारी इमारती ताब्यात घेतल्या; तरीही त्यांचे काहीही वाकडे झाले नाही. व्हाइट हाऊसमधील गुप्त फाईल्स घरी घेऊन जाणारा माणूस घरात अतिरेकीच होता आता तोच अतिरेकीपणा जगासमोर मिरवत आहे. ट्रम्प यांनी अक्षरशः “हिटलरचा बाप” असल्याचं सिद्ध करून दाखवलं आहे.

‘द न्यूयार्क टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही कारवाई सहा महिन्यांपासून आखली जात होती. सीआयएने पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम राबवली. गुप्तहेर व्हेनेझुएलात पाठवण्यात आले, मादुरो सरकारमधील गद्दारांशी संपर्क साधण्यात आला, ज्यांनी अमेरिकेला आतली सारी माहिती पुरवली. मादुरो यांच्या घरातील प्रत्येक कोपऱ्याचा फोटो, सुरक्षेचा आराखडा सगळं अमेरिकेकडे आधीच होतं. जशी सुरक्षा मादुरोंची होती, तसंच घर उभारून त्यावर सराव केला गेला आणि मग ही कारवाई पार पडली.
मादुरो यांना हे सगळं माहीत होतं; म्हणूनच त्यांनी आपल्या नागरिकांना सांगितलं होतं, “अमेरिकेशी बोलण्यात नुकसान नाही.” पण सहा महिन्यांपासून तयारी सुरू असताना 2018 मध्ये “मी मादुरोशी चर्चा करायला तयार आहे” हे केवळ नाटक होतं. अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी कोलंबियाच्या राष्ट्रपतींनाही धमकी दिली. कारण आता व्हेनेझुएलाच्या तेलावर अमेरिकेची नजर आहे आणि तिथलं सरकारही अमेरिकेच्या मुठीत असावं, हीच त्यांची महत्त्वाकांक्षा. हा प्रकार केवळ धोकादायक नाही, तर भयानक आहे.
मागील शतकात असं कधीच घडलं नव्हतं. आज जग एका नव्या प्रकारच्या हुकूमशाहीकडे झुकत आहे. अमेरिकेत दोन वेळाच राष्ट्रपती होण्याचा नियम असताना, कायदे बदलून पुन्हा पुन्हा सत्तेत राहण्याचे मार्ग शोधले जात आहेत. रशियात पुतिनसाठी कायदा बदलला गेला, चीनमध्ये पक्षाने परवानगी दिली; आणि आता अमेरिकेतही तोच खेळ सुरू आहे. संसदेला डावलून निर्णय, काँग्रेसची परवानगी न घेता लष्करी कारवाई हा लोकशाहीचा खून नाही तर काय?
अमेरिका–मेक्सिको सीमेवरील भिंतीसाठी काँग्रेसने निधी नाकारला, म्हणून ट्रम्प यांनी आणीबाणी जाहीर करून संरक्षण मंत्रालयाचा पैसा वापरला. संसद बघत राहिली आणि ट्रम्प यांनी हवं ते करून दाखवलं. अमेरिकेत जन्मलेल्या प्रत्येक बालकाला नागरिकत्व देणारा कायदा बदलण्यात आला; हल्ल्यांसाठी संसदेची मंजुरी घेतली नाही सगळं ‘माझी मर्जी’ यावर चाललं.
एकूण काय तर, डोनाल्ड ट्रम्प यांची वृत्ती म्हणजे “मेरे मन को भाया, मै कुत्ता काट के खाया.” ना आंतरराष्ट्रीय कायद्याची पर्वा, ना संयुक्त राष्ट्रांची, ना स्वतःच्या संसदची. हा माणूस कायद्यापेक्षा मोठा समजतो स्वतःला. मग हा हुकूमशहा नाही, तर काय आहे?
भारतानेही या वागणुकीपासून सावध राहणं गरजेचं आहे. ट्रॅप आल्या पासून अनेक वेळा अमेरिकेने भारताच्या हिताविरोधात पावलं उचलली आहेत. आज जे जग पाहत आहे, ते अभूतपूर्व आहे. आणि असं वाटतं की 2026 मध्ये आपण असं काही पाहणार आहोत जे कधी पाहिलं नाही, कधी कल्पनाही केली नव्हती.
