नांदेड(प्रतिनिधी)-गुजराती गाठी आणि फाफडा या दोघांची जिरवायची असेल तर येत्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि कॉंगे्रस यांच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
आज शहरातील जेतवन मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर कॉंगे्रस खा.प्रा.रविंद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, हनमंत पाटील बेटमोगरेकर, ऍड. अविनाश भोसीकर, शाम कांबळे तसेच वंचित बहुजन आघाडी प्रभाग 7 चे उमेदवार राहुल सोनसळे, इंजि.प्रशांत इंगोले, राजश्री गोडबोले, शेख हुम्मेअयमन सय्यद रिजवान आणि कॉंग्रेस पक्षाचे क्रमांक 8 चे उमेदवार सत्यपाल सावंत, परविन बेगम शेख पाशा, सलिमा बेगम नुरूलाह खान, मुन्ना अब्बास हुसेन यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताची काय अवस्था झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये काय घडले. भारत आणि अमेरिकेची का बिघडली असे असंख्य मुद्दे सांगून या सर्व मुद्यांची जबाबदारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर ठेवतांना त्या दोघांचा उल्लेख गुजराती गाठी आणि फाफडा असा केला. जागतिक परिस्थितीमध्ये सुध्दा मोदी-शाह यांची जिरवायची आहे असे जगातील बहुसंख्य देशांनी ठरविल्याचचे सांगितले. तेंव्हा नांदेडच्या नागरीकांनी त्याची सुरूवात करावी आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्हीच त्यांची जिरवा हे सांगितले. भारताच्या शेजारी असलेल्या कोणत्याही देशासोबत आज मैत्रीपुर्ण संबंध नाहीत. त्यामुळे युध्द होण्याची शक्यता वर्तविली आणि युध्दातून भारतीय नागरीकांना किंबहुना नांदेडच्या नागरीकांना वाचण्यासाठी तुम्ही वंचित बहुजन आघाडी आणि कॉंगे्रस पक्षाच्या युतीला मतदान करा असे सांगितले. भारतीय जनता पार्टी सांगते की, 2029 आणि 2034 च्या लोकसभा निवडणुका आम्ही जिंकणार आहोत हे फसवे वाक्य आहे जे भारतीय जनतेला भ्रामक परिस्थितीकडे नेते तेंव्हा भारतीय नागरीकांनी त्यात फसू नये असे आवाहन ऍड. आंबेडकरांनी केले.
या प्रसंगी बोलतांना खा.प्रा.रविंद्र चव्हाण म्हणाले हिंदु- मुस्लिम असा भेद करत एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये खा.अशोक चव्हाण जे काही सांगतात ती ऑडीओ क्लिप जाणून-बुजून व्हायरल करण्यात आली आहे. खा.अशोक चव्हाण यांच्या घराकडे जाणारा रस्ता एवढ्या गर्दीचा आहे की, तेथेच वारंवार वाहुतक खोळंबते. जे आपल्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याची योग्य सोय करू शकले नाहीत ते नांदेड शहरातील नागरीकांच्या गरजा कसे पुर्ण करतील असा प्रश्न उपस्थित केला. भारतीय राष्ट्रीय कॉंगे्रस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यानंतर अनेकांना पोटसुळ उठला. अनेकांनी या युतीमध्ये मिठ टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणांना विरोध करण्यासाठी युती आम्ही केली आहे. इत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मोठ्या धनशक्तीचा वापर होणार आहे. पण सर्व नागरीकांनी त्याला न घाबरता कॉंगे्रस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करावे असे आवाहन खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांनी केले.
या प्रसंगी बोलतांना माजी महापौर अब्दुल सत्तार म्हणाले एमआयएम शिवाजीनगरमधून चालविली जाते. आज वंचित बहुजन आघाडीने कॉंगे्रस सोबत युती करून निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. याबाबत अब्दुल सत्तार यांनी ऍड. प्रकाश आंबेडकरांना धन्यवाद दिले. कोणत्याही जातीयवादी शब्दांना न घाबरता जनतेने वंचित बहुजन आघाडी आणि कॉंगे्रस पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाम कांबळे यांनी केले.
गुजराती गाठी आणि फाफड्याची जिरवण्यासाठी मनपा निवडणुकीत कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करा-ऍड.प्रकाश आंबेडकर
