नांदेड – राज्य निवडणूक आयोगाचे पत्र 15 डिसेंबर 2025 अन्वये राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम 2025-26 जाहिर झाला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यात 15 डिसेंबर 2025 पासून महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहिर होईपर्यत म्हणजेच 16 डिसेंबर 2026 पर्यत आचारसंहिता अंमलात राहील. त्यामुळे माहे जानेवारी 2026 या महिन्यात पहिल्या सोमवारी म्हणजेच 5 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आयोजित होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
More Related Articles
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 17 मे 2025 रोजी दुपारी 13 वाजता…
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी…
शेकडोंच्या समुदायाने केला मतदानाचा संकल्प ;नांदेडच्या परेड मैदानात रंगारंग कार्यक्रमाची मेजवानी
*गीत, गायन,पोवाडा, पथनाटय, ओव्या, रिल्समधून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन* नांदेड : -26 एप्रिल…
