डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर – स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री, शिक्षणमहर्षी आणि कृषी क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे ” डॉ भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख ” यांची आज दि २७ डिसेंबर रोजी जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ प्रताप चव्हाण वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ मंगेश पवळे, डॉ कार्त्या रेड्डी मॅडम, गंगामोहन शिंदे औषध निर्माण अधिकारी, अत्रीनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रल्हाद आप्पा होळगे लिपिक, श्रीमती साधना भगत अधिपरिचारिका, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, शंकर आवटे डायलेसिस तंत्रज्ञ ग्रामीण रुग्णालय भोकर येथील अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!