निर्दयपणे कोंबून वाहतुक होणारे आठ गोवंश मनाठा पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी) -दोन मालवाहतुक गाड्या पकडून मनाठा पोलीसांनी अत्यंत कु्ररतेने वागणूक देवून गोवंशाची होणारी वाहतुक पकडली आहे. 13 लाख 20 हजारांचा एकुण मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपअधिक्षक डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनात मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विलास चवळी, रेणुका प्रसाद भोपाळकर, रावळे, अशोक दाडे, शाम खनपट्टे, सोनटक्के, अतुल नागरगोजे आदी 25 डिसेंबर रोजी दुपारी हदगाव ते वारंगाव जाणाऱ्या रस्त्यावर गस्त करत असतांना चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.29 बी.ई.7384 आणि एम.एच.28 बी.बी.1282 तपासली. त्यामध्ये अत्यंत दाटीवाटीने कोंबून निर्दयीपणे आठ गोवंश बांधलेले होते. दोन गाड्यांची किंमत 10 लाख आणि गोवंशाची किंमत 3 लाख 20 हजार असा एकूण 13 ल ाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार रेणुका प्रसाद भोपाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इनामुल हसन मोहम्मद इकबाल रा.मुळवा ता.उमरखेड, रमेश लक्ष्मण चंद्रवंशी रा.सुकळी ता.उमरखेड, शेख नजीम शेख खलील रा.देवसरी ता.जिंतूर, शिवाजी पुंजाजी सोनवणे आणि देवराव बबन पोटे रा.औंढा जि.हिंगोली या पाच जणांविरुध्द प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम आणि महाराष्ट्र प्र्राणी संरक्षण अधिनियमाप्रमाणे गुन्हा क्रमांक 230/2025 दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!