नांदेड(प्रतिनिधी)-लोहा बसस्थानकात एका महिलेच्या पर्समधून 1 लाख 18 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरीला गेले आहेत. तसेच मारलेगाव ते नेवरी रस्त्यावर हदगाव तालुक्यात एका व्यक्तीला मारहाण करून त्याचा 7 हजार रुपयांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेला आहे.
लेक्चरर कॉलनी गंगाखेड जि.परभणी येथील महिला ज्योती किशोर मुंडे या 24 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास बसस्थानक लोहा येथे बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असतांना त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 18 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरला आहे. लोहा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 393/2025 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक भोसले अधिक तपास करीत आहेत.
अनंतकुमार प्रभाकर नेवरकर हे व्यक्ती 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास मारलेगाव ते नेवरी रस्त्यावरून नेवरीकडे जात असतांना काही लोकांनी त्यांना थांबवून त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील न्यायालयाची कागदपत्रे व मोबाईल आणि रोख रक्कम असा 7 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. मनाठा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 229/2025 दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक चवळी अधिक तपास करीत आहेत.
लोहा बसस्थानकात 1 लाख 18 हजारांची चोरी
