भारत जगाचे स्वयंपाक घर बनू शकते-गुणवंत पाटील हंगरगेकर

नांदेड(प्रतिनिधी)-भारत हा जगासाठी स्वयंपाक घर होवू शकतो असे प्रतिपादन जिल्हा व्यापारी महासंघाचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले.
नवा मोंढा भागातील माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा यांच्या कार्यालयात जिल्हा व्यापारी महासंघाची बैठक झाली. त्यात अध्यक्ष असलेले ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह हर्षद शाह, एकनाथ मामडे, बद्रीनारायण मंत्री यांच्यासह अनेक सदस्य उपस्थितीत होते. या सर्वांनी एकमताने गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्याध्यक्षपदी निवड केली.
या प्रसंगी पुढे बोलतांना गुणवंत पाटील हंगरगेकर म्हणाले व्यापाराला आदर्श मानणारा समाज आणि देश स्वत: महान बनतो. जगातील असे अनेक देश आहेत. ज्यांची लोकसंख्या भारतातील एका राज्याएवढी आहे. पण ते कृषी उत्पादनामध्ये वरच्या क्रमांकावर आहेत. मग भारतात एवढी जमीन असतांना भारत का मागे राहतो आहे. त्यांनी सांगितले की, शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील समन्वय लक्षात घेवून किंबहुना शेतकऱ्यांचा व्यापारी अर्थ अंमलात आणून भारताला जगाचे स्वयंपाक घर बनविता येवू शकते. बाजारपेठा मोठ्या असणे आवश्यक आहे. त्यावर शासनाचे नियंत्रण नसावे.कारण मागणी आणि पुरवठा या दोघांच्या समन्वयातूनच शेतकऱ्याच्या उत्पादनाचा दर ठरत असतो. म्हणून शासनाचे बहुतेक निर्णय चुकतात. एखाद्या वस्तुला किमान आधारभुत किंमत (एमएसपी) देणे म्हणजे त्या वस्तुची किंमत संपविणे आहे. म्हणून व्यापाऱ्यासोबत खेळण्याची राजकारण्यांची पध्दत बंद व्हायला हवी अशा एकूण अनेक अनुभवातून गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष पद स्विकारतांना भरपूर काम करू असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!