नांदेड(प्रतिनिधी)-जवळा मुरार ता.मुदखेड येथे सकाळी रेल्वेखाली मरण पावलेल्या दोन युवकांचे मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांची ओळख पटली. तेंव्हा पोलीस प्रशासनाने त्यांचे घर गाठले. तेथे तर भयानक परिस्थिती होती. त्या घरात मरण पावलेले हे दोन्ही युवक भाऊ आहेत आणि त्यांचे आई-वडील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आहेत. आता या ऱ्हस्याला उघड करण्याची जबाबदारी नांदेड पोलीसांवर आहे.
आज सकाळी नांदेड पासून जवळच असलेल्या मुगट रेल्वे स्थानक परिसरात उमेश रमेश लखे आणि बजरंग रमेश लखे या दोन युवकांचे मृत्यदेह सापडले. या संदर्भाने दिसणाऱ्या परिस्थितीतून असे जाणवत होते की, या दोघांनी रेल्वेखाली आपला जीव दिला आहे. या दोघांच्या घरी पोलीस प्रशासन पोहचले तेंव्हा तेथे तर भयानक परिस्थिती होती. या दोन युवकांचे वडील रमेश होनाजी लखे आणि आई वडील राधाबाई रमेश लखे या दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले होते. उमेश लखे हे मुदखेड तालुक्यात मनसे तालुका उपाध्यक्ष आहेत. सामाजिक कार्यात त्यांचे मोठे नाव आहे. एकाच घरातील चार जणांचे मृतदेह सापडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोन जणांचे रेल्वेखाली आणि दोघांचे घरात मृतदेह आढळ्याने या घटनेचे ऱ्हस्य उघड करण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे पाहुया पोलीसा यातून काय सत्य बाहेर आणतात.
दोन भावांचे मृत्यूदेह रेल्वेस्थानकात; त्यांचे आई-वडीलांचे मृतदेह घरात गळफास घेवून
