भोकर :- कुटुंब नियोजना मध्ये स्त्री कुटुंब कल्याण शस्रक्रिया करण्यात येत असतात. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ राजाभाऊ बुट्टे यांच्या मार्गदर्शनानुसार व ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश जाधव यांच्या नियोजनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दुर्बीणीद्वारे (लॅप्रोस्कोपी), स्त्री कुटुंब कल्याण टाका शस्त्रक्रिया शिबीर दि २३ व २४ डिसेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आले. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उदिष्ठपूर्ती कडे वाटचाल करत आहेत.
ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दि २३ डिसेंबर रोजी डॉ अनंत चव्हाण सर्जन यांनी टाक्याचे १६ शस्त्रक्रिया केल्या व दि. २४ डिसेंबर रोजी लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ.संतोष अंगरवार यांनी ३३ लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केली, भुलतज्ञ डॉ. अस्मिता भालके मॅडम उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिकारी, परिसेवीका, आरोग्य निरीक्षक, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, सेवक, कक्ष सेवक यांनी परिश्रम घेऊन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी केले..
