हिंगोलीचे पोलीस अधिक्षक हटविले; नवीन पोलीस अधिक्षक निलम रोहन

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने हिंगोली पोलीस अधिक्षकांना फक्त बदलीच केली नाही तर त्यांना प्रतिक्षेच्या यादीत ठेवले आहे. त्यांच्या जागी नवीन पोलीस अधिक्षक आले आहेत. तसेच वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुध्दा बदलण्यात आले आहेत. भोकर जिल्हा नांदेड येथून अपर पोलीस अधिक्षक बर्‍या दिवसापासून नवीन नियुक्तीच्या ्रप्रतिक्षेत होते. त्यांना सुध्दा अनामांकित असलेली नियुक्ती देण्यात आली आहे.
गृह विभागाने आज जारी केलेल्या आदेशात हिंगोलीचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना प्रतिक्षेच्या यादीत ठेऊन त्यांच्या जागी दहशतवाद विरोधी पथक छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधिक्षक निलम रोहन यांना नियुक्ती देण्यात आली आहे. याच आदेशात नांदेड जिल्ह्यातून पुर्वी अपर पोलीस अधिक्षक या पदावरून बदलेली झालेले डॉ.खंडेराव धरणे यांना छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकात पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती दिली आहे.
दुसर्‍या एका आदेशात पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील पोलीस अधिक्षक सौरभकुमार यांना वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक या पदावर नियुक्ती दिली आहे. तसेच वर्धाचे पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांना नागरी हक्क संरक्षण विभाग नागपूर येथे पोलीस अधिक्षक पदावर पाठविले आहे.
काही दिवसांपुर्वी हिंगोली जिल्ह्यात आ.संतोष बांगर यांच्या घरी मोठा लवाजमा पोलीसांचा गेला होता. त्याबद्दल अनेक चर्चा झाल्या. अनेक विषय त्यात जोडले गेले. पण दुजारा मात्र कोणी देत नव्हते. पण काही जानकारांचा मत आहे की, त्या कृतीमुळेच श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी नवीन पोलीस अधिक्षक पाठविण्यात आले आहेत.
वरिष्ठ पदावर असलेल्या नेत्यांनी काही काम सांगितले तर ते ऐकल्यानंतर श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासारखी परिस्थिती आपल्यावर येवू शकते याची आठवण प्रत्येकाने ठेवायला हवी. कारण आजच्या परिस्थितीत श्रीकृष्ण कोकाटे यांना प्रतिक्षेच्या यादीवर ठेवलेले आहे. अर्थात त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. आता त्यांना नियुक्ती कोणती दिली जाईल यावरून हे नक्की ठरेल की, ज्यांच्या आदेशाने आमदारांच्या घरी त्यांनी पोलीस लवाजमा पाठविला होता ते त्यांना आता किती मदत करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!