नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील एका ४२ वर्षीय आरोपीस परभणी येथून अटक केली आहे. या प्रकरणात आरोपी बालाजी विजयकुमार मंगरूळे (वय ४२) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एफ), ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा १८ डिसेंबर २०२५ रोजी नोंदविण्यात आला होता.पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांनी दिलेल्या अहवालानुसार, आरोपी परभणी येथे असल्याची तांत्रिक माहिती मिळाल्यानंतर पोलीस उप अधीक्षक रामेश्वर व्येंजने पोलिस निरीक्षक संतोष तांबे, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शोध पथक तयार करण्यात आले.या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अनुपमा केंद्रे,पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, विनोद देशमुख, विशाल माळवे, गजानन किडे, राजीव घुले, व्यंकट गंगुलवार, विष्णुकांत मुंडे, राहुल लाटकर, देवसिंग सिंगल, नागनाथ चापके, दीपक घोडणे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन पथकाने परभणी येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतले व पुढील तपासासाठी त्याला नांदेड येथे आणण्यात आले आहे.सदर प्रकरणात आरोपी बालाजी मंगरूळ याच्याविरोधात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
More Related Articles
लोहामधील जैन मंदिर फोडून चोरी
लोहा(प्रतिनिधी)-लोहा येथील देऊळगल्ली भागात असलेल्या ऋषभनाथ दिगंबर जैन मंदिराची दान पेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम…
देगलूरमध्ये 50 हजारांची घरफोडी
देगलूर(प्रतिनिधी)-देगलूर येथील बेस काझी गल्लीमध्ये चोरट्यांनी एक घर फोडून 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे…
हदगावमध्ये चोरी; पार्डी ता.लोहा येथे जबरी चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-माळोदेगल्ली हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच…
