श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन शनिवारी अंतर्राष्ट्रीय खेळाडू जर्मनप्रीतसिंघ करणार उद्धघाटन!

नांदेड -देशभरात अति प्रतिष्ठेची मानली जाणारी श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन शनिवार, दि. 20 डिसेम्बर रोजी होत आहे. गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, गुरुद्वारा लंगर साहेबचे मुखी संतबाबा नरिंदर सिंघजी करसेवा वाले, मुखी संतबाबा बलविंदर सिंघजी करसेवावाले आणी गुरुद्वारा माता साहेब चे जत्थेदार संतबाबा तेजा सिंघजी यांच्या पावन उपस्थितित अंतर्राष्ट्रीय हॉकी खेळाडू सरदार जर्मनप्रीतसिंघ याच्या हस्ते उद्धघाटन होणार असल्याची माहिती शिरोमणि दुष्टदमन क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक सरदार गुरमीतसिंघ (डिंपल) नवाब यांनी आज दिली. नांदेड शहरात मागील 52 वर्षांपासून सतत सुरु असलेल्या श्री गुरु गोबिंदसिंघजी शीख हॉकी स्पर्धेस दि. 20 रोजी सकाळी 11.30 वाजता सुरुवात होत असून स्पर्धेचे समापन दि. 27 रोजी श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाशपर्वाच्या रोजी होणार आहे. गुरुजींच्या पावन प्रतिमेस आणी त्यांच्या योगदानास समर्पित या राष्ट्रीयस्तर हॉकी स्पर्धेत एकूण 16 हॉकी संघ सहभागी होणार आहेत. हॉकी इंडियाच्या मान्यतेने यंदा स्पर्धेचा 52 वां वर्ष आहे. राष्ट्रीय खेळ हॉकीला प्रोत्साहित करणारी ही स्पर्धा आहे. नांदेडच्या धरतीवर नवीन उत्कृष्ट खेळाडू तयार होण्यासही वरील स्पर्धा मोलाची भूमिका पार पाडत आहे.
सरदार गुरमीतसिंघ (डिंपल) नवाब यांनी पुढे माहिती दिली की, देशभरातून हॉकी स्पर्धेसाठी पोहचणाऱ्या संघांना सर्वप्रकारे सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यांच्या राहण्याची आणी भोजनाची उत्कृष्ट अशी व्यवस्था करण्यात येत आहे. स्पर्धेचे संचालन राष्ट्रीय आणी अंतर्राष्ट्रीयस्तराचे पंच आणी तांत्रिक पंच करणार आहे.
यावर्षी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघापैकी बीएसएफ जालंधर, पंजाब पोलीस, एसजीपीसी पंजाब, आर्मी इलेवन जालंधर, ए.जी. दिल्ली, आय. टी. दिल्ली, ए. जी. नागपुर, बिलासपुर रेल्वे, ऑरेंज सिटी नागपुर, एमपीटी मुंबई, यूनियन बँक मुंबई, सैफई इटावा, ए. जी. हैदराबाद, कर्नाटक हॉकी सह नांदेडचे युथ खालसा क्लब आणी चार साहिबजादे हॉकी अकादमी टीम सहभागी होणार आहेत. सर्व स्पर्धा खालसा हायस्कूल मिनी स्टेडियम नांदेड मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार आणी ओल्याम्पीयन सरदार जर्मनप्रीतसिंघ यांच्या उपस्थिती आणी मार्गदर्शनाचा सुन्दर असा योग यंदा जुळून आले असल्यामुळे हॉकी खेळाडू मध्येही उत्साह वाढला आहे. वरील स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सरदार गुरमीतसिंघ नवाब आणि हॉकी कमेटीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!