भारतीय बौद्ध महासभा आणि ग्रामस्थांचा संयुक्त कार्यक्रम
नांदेड प्रतिनिधी- नांदेड दक्षिण मतदार संघातील तसेच लोहा तालुक्यातील जवळा (दे) येथील विश्वशांती बुद्ध विहारात सूर्यपुत्र भैय्यासाहेब अर्थात यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जयंती सोहळा उत्साउहात साजरा करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभा या मात्रृ शाखेचे जिल्हा संरक्षण सचिव तथा आकाशवाणी प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड दक्षिण, तालुका लोहा, ग्रामशाखा पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सविस्तर वृत्त असे की विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून चर्चेत असणाऱ्या जवळा (दे) येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष संघर्षाचे महामेरू सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जयंती सोहळा जवळ येथील विश्वशांती बुद्ध विहारांमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संरक्षण सचिव अर्थात समता सैनिकाचे जिल्हा सचिव तथा आकाशवाणी नांदेड प्रासंगिक निवेदक आनंद पुरभाजी गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप, धूप आणि सुगंधी पूजा करून, अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन, पूजापाठ घेण्यात आला. तसेच आशीर्वाद गाथा घेतल्यानंतर, आनंद गोडबोले यांनी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षाची गाथा सर्वांना सांगितली. व ते म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकर हे भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष असून, ते पवित्र अशा चैत्यभूमी स्मारकाचे शिल्पकार आहेत. त्यांना बोधचार्याचे जनक म्हणून देखील त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. अतिशय स्वाभिमानी असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.
या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे ग्रामशाखाध्यक्ष तथा शा.व्य.स.अध्यक्ष सुरेश गोडबोले, सरचिटणीस तथा भिमजयंती मं. अध्यक्ष भीमराव गोडबोले, ग्रा प सदस्य वसंत गोडबोले, संस्कार उपाध्यक्ष अशोक हटकर, संस्कार सचिव सुरज कैलास गोडबोले, संरक्षण सचिव अतुल गच्चे, महिला ग्राम शाखा कोषाध्यक्ष सुनीताबाई गच्चे, महिला ग्राम शाखा उपाध्यक्ष करुणाबाई गच्चे, विराज हटकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी व विश्वशांती बुद्ध विहार समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, भीम जयंती मंडळ, रमाई जयंती मंडळ आणि उपासक उपासिका व बालक बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
