हक्काचा माणूस ; क्षितीज जाधव

कार्यकर्ता म्हणटल की तो केवळ राजकीय नेर्त्यांचीच कामे करण्यात गुंतलेला. परंतु क्षितीज जाधव हे नेहमी जनसामान्यांच्या प्रति आस्था असलेले उभरते नेतृत्व विविध समाजउपयोगी उपक्रम राबवून अल्पावधीतच क्षितीज जाधव यांनी नावलौकिक मिळवला आहे. केवळ नांदेड शहरच नव्हे तर लातूर, उस्मानाबाद, परभणी शहरातील मित्र परिवाराची एक फळी निर्माण केली आहे. या कामांची दखल घेत जनतेच्या आग्रहास्तव त्यांनी मनपा निवडणूक लढविण्याची तयारी सुरु केली असुन सौभाग्यवती प्रवेशिका जाधव यांच्या माध्यमातुन जनतेची सेवा करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. हा त्यांचा प्रयत्न यशस्वी होवो अशी सदिच्छा प्रभागातील नागरीक देत आहेत. विशेष म्हणजे आज त्यांचा मुलगा श्रेयांशु याचाही वाढदिवस असून या दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे.

लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असलेले क्षितीज जाधव हे मागील जवळपास पंधरा वर्षापासून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांच्या जयंती निमित्त गरजुंना अनदान वाटप, कपडे वाटप, अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटप करतात. त्याच बरोबर रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, अरोग्य शिबीर असे अनेक कार्यक्रम घेत त्यांनी सामाजिक भुमिका बजावली आहे. राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपली वाटचाल सुरु केली आहे. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली असून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सामाजि कार्याची दखल म्हणून नुकतेच त्यांना भारतीय जनता पार्टीने जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली होती. केवळ प्रभागापुरते मार्यादीत न राहता अत्यंत कमी वेळेत त्यांनी जिल्ह्याभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतेच दिवाळीनिमित्त त्यांनी सफाई महिला कामगारांना साडी-चोळीचे वाटप केले. आपल्याही कामाची कुणी तरी दखल घेत सन्मान करतोच या भावनेने महिला साफाई कामगार भारावून गेल्या होत्या. एक हक्काचा माणूस म्हणून परिचित असलेले क्षितीज जाधव त्याच प्रमाणे लोकांची कामे देखील करत असल्याने त्यांना मनपाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा त्यांच्या प्रभागतील जनता व्यक्त करीत आहे.

जनसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमी तत्पर अलेल्या क्षितीच जाधव यांचा १० डिसेंबर रोजी वाढदिवस असून महिन्याच्या सुरवातीपासूनच त्यांच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात अनेकांनी सुरु केली आहे.

आपली समाजसेवा ही केवळ शिबीर आणि कार्यक्रम घेण्या पुरती मर्यादीत न राहता जनमान्यांच्या अडचणी कशा सोडवता येतील. यासाठीसस कुणलीही पर्वा न करता सतत सामजिक कर्यात गुुंतुन राहणार्‍या क्षितीस जाधाव यांना व त्यांचा मुलगा श्रेयांशु यास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! यांच्या हातून भविष्यातही समाजसेवा घडो, नगरसेवक होण्याची त्यांची इच्छा पुर्ण होवो हीच सदिच्छा !

–अरविंद गोधणे, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!