काल संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५२ मिनिटे स्वतःचे आणि पक्षाचे राष्ट्रवादाचे “प्रमाणपत्र” सादर केले. जणू काही राष्ट्रवादाचा एकमेव घाऊक पुरवठादार तेच आहेत. पण लगेचच खासदार प्रियंका गांधी यांनी सत्याचा छोटासा इंजेक्शन दिला –
“तुम्ही राष्ट्रवादी नाही; तुम्ही राष्ट्र विभागणारे आहात.”
त्यातही वंदे मातरमचा मुद्दा संसदेत आणायचा कारण काय?बिहार–बंगालची निवडणूक.देश जळो की अर्थव्यवस्था कोसळो, पण निवडणुकीला इंधन मिळाले की झाले.जर खरंच राष्ट्रवाद असता तर शेअर बाजारात जाळले गेलेले सात लाख कोटी रुपये तरी दिसले असते.देशातील १४० कोटी खरे नागरिक देशभक्त आहेत; पण त्यांची आर्थिक कातडी सोलली जाते हे कुणालाच जाणवत नाही.
सेन्सेक्स काल ६०० पॉइंट्सने तळाला गेला.५० पैकी ४६ स्टॉक्स लाल देश जसा लाल-लाल निवडणूक जाहीरनाम्यांनी झाकला जातो, तसाच.परदेशी गुंतवणूकदारांनी १२,५०० कोटी उचलून थेट बाहेरचा रस्ता धरला.पण आपल्या “चमचा” पत्रकारांच्या कॅमेऱ्याचा फोकस मात्र अजूनही फक्त सरकारच्या पायांवरच आहे.अर्थव्यवस्थेवर बातम्या का देतील? त्यासाठी पाठीचा कणा हवा.
देशाची अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे.लोकसभा अध्यक्षांचा आदेश:
“अर्थव्यवस्थेवर चर्चा नको; फक्त वंदे मातरम!”
अहो, छानच आहे — ICU मध्ये असलेल्या अर्थव्यवस्थेला आपण राष्ट्रगीताचं इंजेक्शन देऊया, बघू जिवंत होते का!रुपया तर डॉलरसमोर इतका पडला की त्याने आता योगा सोडून कबड्डी खेळायला सुरुवात केली आहे.८८ वरून ८७ झाला तेव्हा मीडिया सण साजरा करत होता — जणू काही भारताने विश्वचषक जिंकला.आणि आता रुपया ९० पार, पण सर्वांच्या तोंडात आता गोंद लावलेला.
दरम्यान, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवालांचा अर्थशास्त्रीय नवा शोध —
“रुपया वाढतोय कारण जगात सगळीकडे रुपया वापरतात.”
अशी महान ओळख पटली तर फेडरल रिझर्वचे अर्थतज्ज्ञ नोकरी सोडून मेघवालजींकडे क्लासला बसतील काय?

खासदार मनोज तिवारींचा तर मुकुटातला हिऱाच —
“आम्हाला डॉलरवर काही फरक पडत नाही; लोक खिशातून रुपया काढून खरेदी करतात.”
हे ऐकून जगभरचे अर्थतज्ज्ञ ICU शोधत आहेत.
शेअर बाजार तर दररोज अशा पद्धतीने पडतोय की जणू काही कुणीतरी त्याचा पाया उखडून टाकला आहे.
BPCL, वोडाफोन, पीएनबी, गोदरेज, पूनावाला… सगळे घसरत आहेत.
रुपया ९०.११ एवढंही खाली गेला तरी म्हणतात, “अजून स्थिर आहे.”
कुठे? तळघरात.
डॉलर विकून रुपये वाचवण्याचा प्रयत्न चाललाय पण उपयोग?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात –
“रुपया स्वतःची जागा स्वतः शोधतो.”
अहो मग RBI कशाला? रुपयाला Google Maps द्या, तो स्वतःच ‘लोकेशन’ शोधेल!

एका दिवसात सात लाख कोटी बाजारमूल्य गळतंय आणि सरकार म्हणतं — “सगळं ठीक आहे.”
IMF म्हणतं “भारतीय चलन कोपऱ्यावर घासत चाललं आहे.”
पण भारतात मात्र अजूनही सेलिब्रेशन.
मीडिया पाकिस्तानच्या रुपयावर तोंडातून फेस काढतो २८८! २८८!
पण आपल्या रुपयाचा ९० चा टप्पा साजरा करण्याची हिम्मत कुणाकडे नाही.
अफगाणिस्तानची मुद्रा देखील आपल्या रुपयापेक्षा ताकदवान —
आणि आपण म्हणतो: “अर्थव्यवस्था वाढतेय!”देशाच्या अर्थव्यवस्थेचा घोर कोसळत असलेला आवाज आता इतका मोठा झाला आहे की
खोटा राष्ट्रवाद वाजवणारे ढोलही त्याला झाकू शकत नाहीत.
