अर्धापूर स्पेशल: “सरकारी नोकर की वाळू उद्योगपती?””
अर्धापूर तालुक्यात अशी एक “डायनॅमिक ड्यूओ” जोडी आहे — तलाठी साहेब आणि त्यांचे पोलीस नातलग. हे दोघे मिळून कथितपणे असा वाळू व्यवसाय चालवत होते की, पाहणाऱ्यांनाही वाटावं:
“ही कोणती सरकारी नोकरी? की मान्यताप्राप्त Start-Up India?”
मागेही गुन्हे झाले होतेच… पण चालायचंच. कमिटमेंट म्हणतात ते हेच!
आता मात्र अर्धापूर पोलीस ठाण्यात 7(20) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि अचानक काय झालं…
नातलग पोलीस महाशय निलंबित!
तलाठी साहेबही निलंबन प्रस्तावाच्या लाईन मध्ये, एकदम शांतपणे — अगदी राशनच्या दुकानाबाहेर उभ्यासारखे.
घटनेचा “सुपरहिट” प्रसंग
५ डिसेंबर. रात्री १० वाजता.
लोकेशन: विश्वप्रयाग हॉटेलजवळ, देगाव रोड.
एंट्री: तलाठी प्रदीप वामनराव पाटील (उबाळे) साहेब!आणि त्यांनी पाहताक्षणी तहसीलदार शिंदे यांना म्हणे असा डायलॉग डिलिव्हर केला की सलमान खानही लाजेल:
“मादरच—त, माझीच गाडी पुन्हा पकडली काय? तुला इथे नोकरी करायची नाही का?!”
सीनमध्ये थोडं अॅक्शनही होतं — कॉलर पकडण्याचं.
जणू काही “तलाठी—द रिव्हेंज” चा क्लायमॅक्सच.
नंतर पोलीस नातलग महाशयांचा धमकी-परफॉर्मन्स
शिवा गंगाधर पाटील पूर्वी विमानतळ पोलीस ठाण्यात होते.
मग तिथेही “उत्कृष्ट कामगिरी” केल्याने त्यांना मुख्यालयात जवळजवळ सन्मानाने नेण्यात आले.आता या प्रकरणात ते म्हणे तहसीलदार व साक्षीदारांना म्हणाले:“मी पोलीस आहे. तुम्हाला अवघड होईल!”आणि“तुम्हाला नोकऱ्या करायच्या नाहीत का?”
अहो, इतके रोजगारविषयक सल्ले तर एम्प्लॉयमेंट ऑफिससुद्धा देत नाही!
कलमे म्हणजे जणू मेन्यू कार्डच
सुरुवातीला: 132, 131, 212, 115(2)
नंतर: 295 आणि 35
एकूणच गुन्ह्याची थाळी “स्पेशल डिलक्स” आकाराची.
विमानतळावरचा पूर्वस्मरणीय किस्सा
सूत्रांनी सांगितलं की विमानतळावर असताना महाशयांचा एका अधिकाऱ्याशी वाद झाला होता.
त्यावर रात्री २ वाजता त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न!
(हो, काही लोकांसाठी रात्री २ म्हणजे “कामाचा गोल्डन तास” असतो.)
पण तो पराक्रम जमला नाही… आणि थेट मुख्यालय प्रवास सुरू झाला.
निलंबनाची बातमी
विश्वसनीय सूत्र सांगतात:
पोलीस शिवा पाटील महाशय – निलंबित!
तलाठी प्रदीप पाटील साहेब – निलंबनप्रस्ताव रांगेत!
जणू सरकारचं “Buy 1 Get 1 Suspension Free!”
विभागातल्या लोकांचा उद्गार तर खतरनाकच —
“दोन नंबरची कामं करायची होती तर सरकारी नोकरी कशाला घेतली? सरळ उद्योगच सुरू केला असता!”
