नांदेड – सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2025-26 संकलन शुभारंभ कार्यक्रम बुधवार 10 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.15 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024-25 मध्ये उत्कृष्ट संकलन करणाऱ्या कार्यालय प्रमुख, कर्मचारी, सहसंस्था यांना प्रशस्तीपत्रके देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता विशेष गौरव पुरस्कार प्राप्त पाल्यांचा सत्कार व माजी सैनिकांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार वाटप करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, विधवा पत्नी व त्यांचे अवलंबितांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.
