नांदेड(प्रतिनिधी)-भारताचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांकडे सर्वांचेच लक्ष असते. पण शाळेचे मुख्यध्यापकच वर्गात दारु पिऊन बालकांसमोर आय लव्ह यु म्हणून डान्स करू लागले तर या शिक्षकापासून आमच्या देशाचे भविष्य नष्ट होण्याशिवाय काय होणार आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार माहुर तालुक्यातील शेकापुर या गावात जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वर्मा हे आहेत. ते एका वर्गात जातात तेथे लहान बालक बालिका आहेत. त्यांना खुर्चीवर बसता सुध्दा येत नाही. त्यात काही विद्यार्थी काही बोलले तेंव्हा मुख्याध्यापक साहेब खुर्चीवरून उठून आय लव्ह यु म्हणत डान्स करत आहेत. काय धड्डा घ्यावा या शिक्षकाकडून भारताचे भविष्य तयार करण्याची जबाबदारी आपण हून त्यांनी स्विकारलेली आहे. कोणी बळजबरी केली नव्हती. पण अशा पध्दतीने वर्गात वागून काय संदेश समाजाला ते देत आहेत. हा प्रश्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहेत म्हणजे त्यांच्यावर या समाजातील सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील बालकांना शिक्षण द्यायचे आहे आणि त्यांना समृध्द करायचे आहे. जे स्वत:च समृध्द नाहीत ते बालकांना काय समृध्द करतील असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
या घटनेचा व्हिडीओ पाहतांना असे स्पष्टपणे जाणवते की, या शाळेतीलच कोणी तरी व्यक्तीने हा व्हिडीओ बनविलेला आहे. आपण ज्या ठिकाणी काम करतो. त्या ठिकाणी आपल्या विरोधात बरेच लोक असतात आणि जेंव्हा तुम्ही दारु पिऊन त्या ठिकाणी काम करता तेंव्हा विरोधकांना आपोआपच संधी प्राप्त होतेे आणि भारतात ही उक्ती प्रसिध्द आहे की, संधीचे सोने करणे अशा पध्दतीने मुख्याध्यापक वर्माच्या विरोधकांनी या संधीचे सोने केले आहे.
संबंधीत व्हिडीओ…
जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापकाचा दारु पिऊन डान्स
