नांदेड(प्रतिनिधी)-2015 ते 2019 दरम्यान पोस्ट मास्तर पदावर असतांना 8 लाख 81 हजार 400 रुपयांचा अपहार करणाऱ्या व्यक्तीविरुध्द सहा वर्षांनी गुन्हा दाखल झाला.
भोकर येथील डाक निरिक्षक प्रविण गुरुनाथराव भाजी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मधुकर विश्वेश्र्वर तळणीकर रा.तळणी ता.हदगाव हे हदगाव तालुक्यातील तळणी येथे 2 नोव्हेंबर 2015 ते 20 मार्च 2019 दरम्यान पोस्ट मास्तर या पदावर कार्यरत होते. यावेळी सुकन्या समृध्दी योजनेतील 70 खातेदारांनाकडून 8 लाख 81 हजार 400 रुपये आणि आवृत्ती बचत खात्यातील 16 खातेदारांकडून 14 हजार 700 रुपये रक्कम स्वत: स्विकारली मात्र डाक खात्याच्या संगणक प्रणालीमध्ये त्याची नोंद केली नाही. अर्थात त्यांनी जवळपास 9 लाख रुपयांचा अपहार करून विश्र्वासघात केला आहे. हदगाव पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 411/2025 प्रमाणे दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक बेंबडे अधिक तपास करीत आहेत.
पोस्ट मास्तरने सहा वर्षापुर्वी 9 लाखांचा अपहार केला
