पंतप्रधान कार्यालयात आज भूकंप झाला आहे. गेल्या सहा वर्षांपासून पीएमओ, मीडिया आणि राष्ट्रीय कथानक नियंत्रित करणारे हिरेन जोशी अचानक “हटवले” गेल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
हिरेन जोशी,मोदींचे डोळे-कान, मीडिया मालकांना दररोज आदेश पाठवणारे, कोणती बातमी द्यायची, कोणती गिळायची, कोणते शब्द वापरायचे हे ठरवणारे. मोदी जे पहिले स्थानिक भाषेतील वाक्य बोलतात, तेही जोशींच्याच टेबलावरून तयार होई.आता प्रश्न एकच, त्यांना काढून टाकले का, राजीनामा मागितला का, की शांतपणे दुसरीकडे हलवले? अधिकृत मौन दाटलेले.


दरम्यान काँग्रेसचे पवन खेड़ा यांनी थेट आरोप केले,परदेशी व्यावसायिक संबंध, बेटिंग अॅप्सशी जोड, आणि लोकशाहीची हत्या करण्यातील सहभाग. पंतप्रधान कार्यालयात बसून व्यवसाय? खेड़ा यांनी ही चौकशी अपरिहार्य असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे,खेड़ा यांनी नावासकट केलेल्या आरोपांनंतरही एकाही प्रसारमाध्यमाने ही बातमी दाखवली नाही. हीच हिरेन जोशींच्या छायेची खरी ताकद.
त्यांच्याच हस्तक्षेपातून नवनीत सहगल यांचा प्रसार भारतीत प्रवेश झाला आणि आता त्यांचा राजीनामा निश्चित झाला. तुरुंगातून सुटलेल्या सुधीर जोशी यांना १५ कोटींचे पॅकेज देऊन शो देण्यात आल्याचेही बोलले जाते. पण हिरेन जोशींबाबत मात्र पूर्ण अंधार.खेड़ा यांनी आरोप केला,चीनवरील काल्पनिक विजय, पाकिस्तानवरील कब्जा, न पडणारा GDP या सगळ्या प्रचारकथांचे जनक म्हणजे हिरेन जोशी. “मोदींचा मास्टर स्ट्रोक” या नावाने फिरणाऱ्या ब्रेकिंग्जही त्यांच्याच निर्मिती.
द प्रिंट नेही हिरेन जोशींबाबत मोठी स्टोरी दिली होती. ती आता गायब.
ज्या नागरिकांपर्यंत पोहोचायला हव्या त्या कितीतरी बातम्या गायब होण्यामागे कोण? बोट सरळ हिरेन जोशींकडेच.मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील दीड वर्ष पूर्ण होत असताना पीएमओतील सर्वात ताकदवान व्यक्तीभोवती वाद भडकणे हे सरकारसाठीही गंभीर.
गेल्या अनेक वर्षांत मीडिया स्वतः बातमी शोधत नव्हता,वायरिंग हिरेन जोशी करत होते.आता ते नाहीत… म्हणजे मीडियाचेही स्क्रिप्टलेखन कोसळणार.आणि आता देशाचा थेट प्रश्न हिरेन जोशींचे नेमके काय झाले?हा प्रश्न पत्रकार प्रशांत कदम यांनीही उघडपणे विचारला आहे.
