नांदेड जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हाध्यक्ष पदी कमल दर्डा यांची निवड

नांदेड – जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना ६१५ जिल्हा शाखा नांदेडच्या नुतन जिल्हाध्यक्ष निवडी च्या अनुषंगाने अशोक कासरीळीकर विभागीय अध्यक्ष व राजेशजी मामुलवार वरिष्ठ सल्लगार जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली दि. २ डिसेंबर २०२५ मंगळवार रोजी सायंकाळी ४.३० वाजता बैठक आयोजित केली होती. त्या अनुषंगाने बैठकीत नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष पदी- कमल दर्डा, सचिव पदी- बालाजी अटकळे, उपाध्यक्ष पदी – हरिनारायण राजे वरील प्रमाणे नुतन कार्यकारिणीची निवड करुन उर्वरित कार्यकारिणी जशास तशी ठेवण्यात आली आहे.यापुढे जिल्हा संघटनेची व तालुका संघटनेची ईतर पदे निवडण्यात येतील असे निवडी बाबतच्या सभेमध्ये जाहीर करण्यात आले.
नूतन जिल्हाध्यक्ष कमल दर्डा यांनी सांगितले की, जिल्हा परिषद कर्मचारी यांचे मासिक वेतन दर महा ५ तारखेच्या आत होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!