जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह रोखण्यात आले यश

बाल विवाहाबाबत माहिती मिळाल्यास;तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

नांदेड  – नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बाल विवाह मुक्त भारत 100 दिवस अभियान सुरु आहे. जिल्ह्यातील एका 17 वर्षीय बालिकेचा बाल विवाह होणार असले बाबत गोपनीय माहिती चाईल्ड लाईन 1098 ला प्राप्त झाली. सदरील तक्रार 1098 वर प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालया अंतर्गत चाईल्ड हेल्प लाईनच्या ऐश्वर्या शेवाळे व दिपाली हिंगोले यांनी पिडीत मुलीच्या घरी गृहभेट देऊन मुलीच्या आई वडीलांचे समुपदेशन केले. मुलीच्या वयाबाबत खात्री करुन बाल विवाहाच्या दुष्परिणामाबाबत व बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 बाबत सविस्तर माहिती दिली. बालविवाह हा बेकायदेशीर असल्याबाबत मुलीच्या पालकांना समजावुन सांगण्यात आले.

मुलीला काळजी व संरक्षणाच्यादृष्टीने बाल कल्याण समिती, नांदेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. पालकांचे बाल विवाह न करणे बाबतचे हमी पत्र घेण्यात आले असुन सदरील बाल विवाह रोखण्यात आला आहे.बाल विवाहाची कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ शहरी भागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच ग्रामीण भागात ग्रामसेवक, अंगणवाडी सेवीका, चाईल्ड हेल्प लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. जेणेकरुन भविष्यातील अनिष्ठ प्रथा रोखता येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!