चिमुकल्यांनी जाणून घेतले मातीचे महत्व ; जवळा देशमुख येथे मृदेसंबंधी जागरुकता निर्मितीचा प्रयत्न 

५ डिसेंबर : आज जागतिक मृदा दिन;जवळ्याच्या विद्यार्थ्यांचे जडले मातीशी नाते…!
नांदेड – दरवर्षी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस साजरा केला जातो. जागतिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने मृदेचं महत्व अन्यसाधारण असं आहे. अलिकडच्या काळात झपाट्याने वाढतच चालेले शहरीकरण, सिमेंटचे रस्ते यामुळे मृदेची अधिक प्रमाणात झीज होत आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते, शहरीकरणासाठी आणि उद्योगधंद्यांसाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अशा प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होत‌ आहे. त्यामुळे यासंदर्भात शेतकरी आणि सामान्य माणसांसह विद्यार्थ्यांमध्येही मृदेसंबंधी जागरुकता करण्याच्या उद्देशाने जवळा देशमुख येथे विद्यार्थ्यांचे ‘जडले मातीशी नाते’ हा कार्यक्रम घेण्यात आला.
         जागतिक मृदा दिनाच्या औचित्याने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सकाळीच ( ता. ४ डिसेंबर) विषय शिक्षक उमाकांत बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मातीच्या विविध प्रकारांची माहिती देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, विषय शिक्षिका संगिता बडवणे, सहशिक्षक संतोष घटकार, मारोती चक्रधर, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुरेश गोडबोले, आनंदा गोडबोले, सुरेश गोडबोले यांची उपस्थिती होती.‌ यावेळी बोलतांना बेंबडे म्हणाले की, केवळ एक इंच सुपीक मृदेचा थर तयार होण्यासाठी ८०० ते १००० वर्षांचा कालावधी लागतो. मृदेचं संरक्षण म्हणजे संपूर्ण सजीवांचं संरक्षण.‌ जगातील ९५ टक्के अन्नधान्य मृदेच्या माध्यमातून येतं. तसेच मृदेत पृथ्वीवरील एकूण सजीवांपैकी २५ टक्के सजीव आसरा घेतात. फळे, भाज्या आणि अन्नधान्याची गुणवत्ता ही मातीच्या गुणवत्तेवरुन ठरते. सध्या या मृदेच्या संवर्धनासमोर वातावरण बदलाचं मोठं आव्हान उभं आहे. माती हा एक जिवंत स्त्रोत आणि २५% पेक्षा जास्त ग्रहांचे जीवन आहे. आपले ९५% अन्न मातीमधून येते फळे, भाज्या आणि धान्य यांचे गुणवत्ता व प्रमाण मातीच्या आरोग्यावर अवलंबून आहे. पृथ्वीवरील जीवन टिकवण्यासाठी मातीचे जीव सतत कार्यरत असतात. माती हवामान बदल आणि ग्लोबल वार्मिंगशी लढायलाही मदत करते.
           शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यघटकांशी सांगड घालत विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मातीचे विविध प्रकार आणि वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनीही विद्यार्थ्यांना माहिती दिली. ते म्हणाले, माती जीवनासाठी महत्त्वाची आहे. कारण ती अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध यासह जीवनाच्या चार प्रमुख साधनांचा स्रोत आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आवश्यक आहे. माती जीवनासाठी अत्यावश्यक आहे. कारण ती अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध यासह जीवनाच्या चार प्रमुख साधनांचा स्त्रोत आहे. त्यामुळे मातीचे संवर्धन आवश्यक आहे. याशिवाय माती वेगवेगळ्या प्रमाणात खनिजे, सेंद्रिय पदार्थ आणि हवा यांनी बनलेली असते. जीवनासाठी ते महत्त्वाचे आहे कारण ते वनस्पतींच्या वाढीसाठी एक माध्यम आहे. अनेक कीटक आणि इतर जीवांचे घर आहे. हे पृष्ठभागावरील पाण्यासाठी आणि वातावरणातील वायूंच्या देखभालीसाठी गाळण्याची प्रक्रिया प्रणाली म्हणून देखील कार्य करते. त्यामुळे मातीच्या नुकसानाबाबत अधिक जनजागृती करण्याची गरज आहे.
आपण काय केले पाहिजे?
मातीचे प्रदुषण थांबविण्यासाठी सगळ्यात आधी प्लास्टिकचा वापर टाळायला हवा. पर्यावरणास अनुकूल, बागकाम, साफसफाईची आणि वैयक्तिक काळजीची उत्पादने निवडली पाहिजेत. बॅटरीसारख्या घातक कचर्‍याची जबाबदारीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. आपला अन्न कचरा कंपोस्ट करण्यात यावा. आपण वनस्पती-आधारित आहार घेतला पाहिजे. मातीची झीज रोखण्यासाठी जंगलतोडीवर बंदी वृक्ष लागवडीवर विशेष भर, उतार असलेल्या जमिनीवर बंधारे बांधून मातीची धूप रोखणे, बांधकाम आणि खाणकामात मातीची धूप होण्यापासून संरक्षण करण्यावर भर देणे, शेताची नांगरणी उताराच्या विरुद्ध करणे आदी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच माती पोषक तत्वांमध्ये मौल्यवान बनवण्यासाठी पीक रोटेशन तंत्राचा अवलंब वाढवण्याची गरज आहे, अशी माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!