नांदेड(प्रतिनिधी)-जमीनीच्या संदर्भाची केस परत घेण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करून धमकी दिल्यामुळे एका 29 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणातील चार आरोपींना पहिल्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या तक्रारीत ऍट्रॉसिटी कायदा जोडलेला आहे.
सुखानंद किशन कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवपुरी ता.हदगाव येथील मौजे भदंड टेकडी ता.हदगाव येथे त्यांचे पुत्र दयानंद सुखानंद कदम (29) यांनी 31 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान कोणते तरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या संदर्भाने सुखानंद कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवपुरी ता.हदगाव येथील कैलास तुकाराम माने, सतिश केरबा पिरटवाड रा.तामसा, तेजस जितेंद्र येवले आणि सुशिल उर्फ पप्पु शिवाजीराव नावडे रा.हदगाव यांनी दयानंद कदमला जमीनीसंदर्भाचा खटला परत घेण्याच्या कारणावरुन जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळेच त्याने आत्महत्या केली आहे. हदगाव पोलीसंानी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा भंग करणे या संदर्भाने गुन्हा क्रमांक 412/2025 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास हदगावचे पोलीस उपअधिक्षक डी.एस.हाके यांच्याकडे देण्यात आला. आज नांदेड न्यायालयात सरकारी वकील ऍड. एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राहय मानुन न्यायालयाने या चार जणांना एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चार जणांना पोलीस कोठडी
