नांदेड पोलीस परिक्षेत्रात  ६ महिन्यात ८,९७० गुन्हे, ५३ कोटींची जप्ती  

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलीस परिक्षेत्र विभागातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांमध्ये मे ते ऑक्टोबर या सहा महिन्यांत अवैध व्यवसायांविरोधात मोठी मोहीम राबविण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या माहितीनुसार, या कालावधीत एकूण ५३ कोटी ८६ लाख ३९ हजार ३४८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८,९७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये १०,४४७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फक्त ऑक्टोबर महिन्यात भरीव कामगिरी

ऑक्टोबर महिन्यातच चारही जिल्ह्यांमध्ये मिळून
१४ कोटी ६६ लाख ३७ हजार ९३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त
तर १,४६६ गुन्हे दाखल झाले आहेत. या महिन्यातील आरोपींची संख्या १,६९१ आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी (ऑक्टोबर)

नांदेड

  • गुन्हे: ३८७
  • जप्त मुद्देमाल: १० कोटी ६८ लाख ३६ हजार ४२८
  • आरोपी: ५४८

परभणी

  • गुन्हे: ५३८
  • जप्त मुद्देमाल: १ कोटी १ लाख ५३ हजार ५८०
  • आरोपी: ५५७

लातूर

  • गुन्हे: ३५३
  • जप्त मुद्देमाल: १ कोटी २ लाख ७१ हजार ७०६
  • आरोपी: ३८२

हिंगोली

  • गुन्हे: १८८
  • जप्त मुद्देमाल: १ कोटी ९३ लाख ७६ हजार २१७
  • आरोपी: २०४

गांजाची लागवड उधळली; दोन जण अटकेत

नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि परभणी जिल्ह्यातील पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या दोन व्यक्तींना पकडण्यात आले. या प्रकरणात ६ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी यांनी लोहा आणि पूर्णा पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.

इतर कारवाया

  • ८७ जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई
  • जुगारांशी संबंधित ५ व्यक्तींविरोधात कायद्यानुसार कडक कार्यवाही

नागरिकांसाठी नवी “खबर हेल्पलाइन”

अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस विभागाने नवी ‘खबर’ हेल्पलाइन ९१५०१००१०० सुरू केली आहे.या क्रमांकावर नागरिक कॉल करून किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती देऊ शकतात.

विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in संकेतस्थळावर पाठवावी, जेणेकरून अवैध धंदे संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!