नांदेड(प्रतिनिधी)-शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकात कळमनुरी तालुक्यातील एक महिला वाहकासोबत बोलत असतांना तिच्या बॅगमधून 9 लाख 21 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.
मौजे धानोरा जहॉंगिर ता.कळमनुरी जि.हिंगोली येथील सध्या भावसार चौक नांदेडमधील महिला सविता रवि शिंदे या मध्यवर्ती बसस्थानकात 1 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 3.30 वाजेदरम्यान उपस्थित होत्या. बस वाहकासह विचारणा करण्यासाठी गेल्या असतांना गर्दीचा फायदा घेवून कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्सची चैन काढून त्यातून 9 लाख 21 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 889/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक बोयने अधिक तपास करीत आहेत.
मुखेड-नरसी रस्त्यावर जबरी चोरी
शिवराज कामाजी पवळे हे 29 नोव्हेंबर रोजी रात्री 11.30 वाजता जयमहाकाली पेट्रोलपंप, मुखेड-नरसी रस्त्यावर असतांना विशाल बाभळे रा.बजरंगनगर मुखेड या व्यक्तीने त्यांना गायछाप मागितली. त्यांना तेथे असलेल्या पानटपरीच्या मागे नेऊन त्यांच्यासोबत झटापट करून त्यांच्या खिशातील 3 हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे एक पान 9 हजार रुपये किंमतीचे असा एकूण 15 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे.त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या साक्षीदारांना आणि या प्रकरणातील फिर्यादी शिवराज पवळे यांना जिवे मारण्याची धमकी सुध्दा दिली आहे. मुखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 271/2025 प्रमाणे दाखल केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.
नांदेडच्या बसस्थानकात 9 लाख 21 हजार रुपयांचे दागिणे चोरीला गेले
