कोणत्या हंगामात शेतात काय पेरायच, कधी विकायचं, शेतकऱ्यांना सांगणार महाविस्तार ॲप !

नांदेड –  कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार हे एआय ॲप राज्यभर सुरु केले आहे. त्यात शेतीविषयक, हवामानासंदर्भात माहिती, पीकविषयी सल्ला, पिकांना द्याव्या लागणाऱ्या खतांच्या मात्रांचा अंदाज आणि कीडरोगाविषयी माहितीसह बाजारभाव पाहण्याची सुविधा आहे. हे ॲप राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या सहकार्यातून महाविस्तार ॲप सुरू करण्यात आले आहे. त्यातून शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती मिळणार आहे.

महाविस्तार ॲप कृत्रिम बुद्धिमतेवर आधारित आहे. त्यात शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतील चॅटबॉट देण्यात आला आहे. या चॅटबॉटला शेतकरी प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे शेती कामात निश्चित मदत होणार आहे.

मला प्रश्न विचारा : चॅटबॉट देणार माहिती.

यात चॅटबॉट एक संगणकीय प्रणाली आहे. त्यात संवाद करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. चॅटबॉट्सचा उपयोग विविध सेवा देण्यासाठी, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, मदत करण्यासाठी किंवा विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी केला जातो. त्यामुळे वेळ आणि श्रम वाचतो. शेतकऱ्यांना सहज शेतीची माहिती मिळणार आहे.

फवारणी, खत, हवामानाचा अंदाज.

हवामान बदलाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर आव्हाने उभी आहेत. हवामान बदलांना तोंड देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती दिली जाणार आहे. अॅपमध्ये हवामान अंदाज, पीक लागवड, लागवडीची पद्धत, कीड व्यवस्थापन, कीड व्यवस्थापनाच्या पद्धती, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीकसल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती मिळणार आहे.

ॲपमध्ये फार्मर आयडी टाकून करा लॉगिन.

मोबाईलमध्ये ॲप घेण्यासाठी फार्मर आयडी टाकून लॉगिंन करता येते. तसेच फार्मर आयडी नसल्यास मोबाइल नंबर टाकूनही लॉगिन करता येते. या अॅपच्या माध्यमातून ही सर्व माहिती मिळते.

काय आहे महाविस्तार ॲप ?

कृषी विभागाने तंत्राच्या मदतीने महाविस्तार हे ॲप शेतक-यांच्या प्रगतीसाठी तयार केले आहे. त्यात शेतीविषयक संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आहे. या अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती महाविस्तार अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ऑडिओ आणि व्हिडीओ पद्धतीने शेतीपूरक मार्गदर्शन मिळणार आहे. शेतक-यांसाठी महाविस्तार अॅपमधून बाजारभाव, हवामान अंदाज समजणार आहे. एका क्लिकवर चॅटबॉटवर शेतकऱ्यांच्या सर्व समस्याची उत्तरे अचूक मिळणार आहेत.

पेरणीपासून शेतमाल विक्रीपर्यंतचा सल्ला.
खरीप पेरणीपासून हवामान अंदाज, पिकांना वेळोवेळी द्यावे लागणारे खताचे डोस, फवारणी, हवामान बदल, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीक सल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती या ॲपवर मिळणार आहे. शेतीमाल विक्रीचा सल्लाही दिला जाणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आजच महाविस्तार एआयॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!