छत्रपती संभाजीनगर – भारत निवडणूक आयोगाकडून औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषीत करण्यात आलाआहे. या कार्यक्रमानुसार 01 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पात्र मतदारांची नोंदणी करण्यात येऊन मतदार याद्या तयार करण्यात येत आहेत.
यानुसार 03 डिसेंबर, 2025 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी दावा असल्यास किंवा समाविष्ट नावाबाबत किंवा एखाद्या नोंदीच्या तपशीला संदर्भात कोणतीही हरकत असल्यास 18 डिसेंबर, 2025 रोजी किंवा त्यापूर्वी हरकती दाखल करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.प्रारूप मतदार यादीची प्रत तपासणीसाठी कार्यालयीन वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये आणि तहसिल कार्यालये येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तरी पात्र मतदारांनी आपले दावे आणि हरकती नमुना 18(नवीन नाव नोंदवणे), 7(समाविष्ट नाव वगळणे) किंवा 8 (तपशीलामध्ये बदल करणे) या नमुन्यामध्ये वेळेत दाखल करावेत, असे कळविण्यात आले आहे.
